नारायणी शास्त्रीच्या पदरी नवी मालिका 

टीम ई सकाळ
गुरुवार, 8 जून 2017

मुंबई : नारायणी शास्त्रीने पुन्हा एकदा टिव्हीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘चक्रव्यूह’ या नव्या मालिकेतून ती समोर येते आहे. या मालिकेच्या अगदी वेगळ्य़ा कथानकामुळे प्रेक्षकांमध्ये विलक्षण उत्सुकता निर्माण होईल असा विश्वास निर्मात्याना वाटतो. 

या मालिकेत माय-लेकींमधील कडवट संबंधांची कथा गुंफण्यात आली असून कथानक एका शाही औद्योगिक घराण्याशी संबंधित आहे. आजवर आपल्या विविध भूमिकांतील अप्रतिम अदाकारीमुळे प्रेक्षकांवर आपली छाप उमटविलेली नारायणी शास्त्री या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत असेल. यात ती सत्रुपा या राजमातेची भूमिका रंगविणार आहे.

सत्रुपा ही खंबीर आणि कठोर मनाची स्त्री असून आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. घरातील सारे निर्णय तीच घेते. या भूमिकेला नारायणी शास्त्रीच पूर्ण न्याय देऊ शकेल, याची निर्माता-दिग्दर्शकांना खात्री होती.

पूर्वी ‘स्टार प्लस’वरील ‘क्यों कि सास भी कभी बहू थी’ या गाजलेल्या मालिकेत नारायणीने एक अविस्मरणीय भूमिका साकारली होती. आता तिला पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत पाहण्यास प्रेक्षक उत्सुक बनले आहेत.

Web Title: Narayani shastri new serial esakal news

टॅग्स