
Naseeruddin Shah : 'या देशात राहण्यात काय अर्थ'? मुघलानंतर आता मुस्लिमांवर निशाणा!
Naseeruddin Shah Bollywood Actor Mughal And Muslim community : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. त्याचे कारण त्यांनी मुघलांविषयी केलेलं वक्तव्य. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांना सोशल मीडियावरुन ट्रोल होताना दिसत आहे. एका वेबसीरिजच्या निमित्तानं शहा यांनी केलेलं विधान चांगलेच व्हायरल झाले आहे.
मला ज्यावेळी तुम्ही धर्माविषयी काही प्रश्न विचारता तेव्हा त्यावर काय बोलावं हे कळत नाही. माझे चांगले मित्र देखील त्यावर बोलताना वेगळी भूमिका घेतात. मला व्यक्तिगत धर्माविषयी काहीही वाटत नाही. मला तुमच्यातील मानवता सर्वात जास्त महत्वाची वाटते. मी त्याच गोष्टीचा सर्वाधिक विचार करतो. आपण त्याला विसरता कामा नये. मला कोणत्याही अमुक विचारगटाचा समजण्याची चूक करु नका. असे नसिरुद्दीन शहा यांनी म्हटले होते.
Also Read - डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही
काही दिवसांपूर्वी नसिरुद्धीन शहा यांनी मुघलांवर एक वक्तव्य केले होते. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. ते म्हणाले होते की, तुम्ही प्रत्येकवेळी मुघलांच्याबाबत जो काही विचार करता तो चुकीचा आहे. त्यामुळे आपण आपल्या देशातील इतिहास समजून घेण्यात कमी पडतो असे म्हणावे लागेल. पहिल्यांदा भारतातील ऐतिहासिक पुस्तकं स्वदेशी संस्कृती आणि मुघलांविषयी वेगळ्या प्रकारची प्रतिमा निर्मिती करणारी होती.
तुम्हाला जर पहिल्यापासूनच मुघलांचा एवढा राग होता तर मग त्यांनी तयार केलेल्या ज्या ऐतिहासिक संस्कृतीच्या पाऊलखुणा होत्या त्या नष्ट करायला हव्या होत्या. मुघलांनी तयार केलेल्या वास्तू देखील पाडून टाकायला हव्या होत्या. अशी प्रतिक्रिया नसिरुद्दीन शहा यांनी दिली आहे.
नसिरुद्दीन शहा म्हणाले की, ताज डिव्हायडेड बाय ब्लड ही मालिका माझी शेवटची मालिका असेल. यानंतर एवढ्या मोठ्या भूमिका करणं मी टाळणार आहे. याचे कारण मीच आता माझ्या भूमिकांवर मर्यादा आणल्या आहेत. माझी प्रकृती आणि काम याचे गणित कुठेतरी जुळावं हा त्या मागील विचार असल्याचे शहा म्हणाले आहेत. आता खूप थकायला होते. अशी भावना नसिरुद्धीन शहा यांनी व्यक्त केली आहे.