Naseeruddin Shah : फिल्मफेअर पुरस्कार माझ्या बाथरुमच्या....नसिरुद्दीनजी भलतंच बोलून गेले!

गेल्या चार दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात स्वताची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नसिरुद्दीन शाह यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Naseeruddin Shah Taj Divided By Blood Mughals
Naseeruddin Shah Taj Divided By Blood Mughals Esakal

Naseeruddin Shah Filmfare Awards bollywood actor handle : आपण जे काही बोलू त्यावर ठाम राहू, मग त्याविषयी कुणी काहीही म्हटलं, त्याला विरोध केला तरी घाबरायचं नाही. अशी भूमिका नेहमीच घेणाऱ्या प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह यांची द ताज नावाची मालिका चर्चेत आली आहे. यापूर्वी देखील शाह यांनी त्यांच्या वक्तव्यांनी वेगळीच वातावरण निर्मिती केली होती.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात स्वताची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नसिरुद्दीन शाह यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नसिरुद्दीन शाह हे अजुनही रंगमंचावर कार्यरत असणारे अभिनेते आहे. नवोदित कलाकारांना ते प्रेरित करतात. त्यांना मार्गदर्शन करतात. गुणवत्तेचा अट्टाहास धरत आपण जे काही करु ते सर्वोत्तमच असायला हवे असा त्यांचा आग्रह असतो.

Also Read - Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

नसिरुद्धीन शाह हे कधीही कोणत्या पुरस्कार सोहळ्यात दिसलेले नाहीत. त्या सोहळ्याविषयी त्यांचे फारसे अनुकूल मत आहे असेही नाही. त्यांनी त्यावर त्यांच्या शैलीत धारदार मतप्रदर्शन केले आहे. आता शाह यांनी त्यांना फिल्मफेअरचे जे पुरस्कार मिळाले आहेत त्याविषयी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आले आहे. यापूर्वी शाह यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये द केरळ स्टोरीवरुन प्रतिक्रिया दिली होती.

केरळ स्टोरीसारखे चित्रपट कलाकारांनी करताना विचार करावा अशी प्रतिक्रिया शाह यांनी दिली होती. यावेळी त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते मनोज तिवारी यांनी शाह यांच्यावर कडक शब्दांत निशाणा साधला होता. शाह सारख्या माणसांची नियतच खोटी आहे. असे तिवारी म्हटले होते.

Naseeruddin Shah Taj Divided By Blood Mughals
Naseeruddin Shah: 'आजकाल मुस्लिमांचा द्वेष करणं ही फॅशन...': नसीरुद्दीन शाहांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

शाह यांनी आपल्याला जे पुरस्कार मिळाले त्याचे आपण काय करतो याविषयी सांगितलं आहे. मला जे काही पुरस्कार मिळाले त्याचे आता फारसे अप्रुप वाटत नाही. सुरुवातीच्या काळात एकदम नवल वाटायचे. आता त्यात काही मुल्य राहिलेले नाही. ज्यावेळी माझ्याकडे खूप पुरस्कार येऊ लागले त्यावेळी मला कळले की हा सगळा लॉबिंगचा परिणाम आहे. जेव्हा मला पद्मश्री आणि पद्मभुषण सारखा पुरस्कार मिळाला तेव्हा माझ्या वडिलांची आठवण आली होती.

Naseeruddin Shah Taj Divided By Blood Mughals
Kangana Ranaut : 'माझ्यामुळे बॉलीवूडमध्ये आज...' कंगनानं तोडले अकलेचे तारे!

माझे वडिल मला नेहमीच म्हणायचे अॅक्टिंगसारखे फालतू काम करतोस त्याचा काही उपयोग होणार आहे का, त्यावेळी मी त्यांना ते दाखवून दिले होते. या पुरस्कारांनी मी खूप आनंदित झालो होतो. मात्र आता जे काही पुरस्कार मिळाले त्याचा फारसा आनंद नाही. मी आता मला जे फिल्मफेअर अॅवॉर्डस मिळाले आहेत ते माझ्या फार्म हाऊसवर ठेवले आहेत. त्या फार्म हाऊसच्या बाथरुमच्या दाराचे हँडल त्या पुरस्कारापासून तयार करण्यात आली आहे. असे शाह यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com