
Naseeruddin Shah : 'मुघलांनी काहीही वाईट केलं नाही, अकबरानं तर कधीही...' नसिरुद्दीन शहांना झालं तरी काय!
Naseeruddin Shah Taj Divided By Blood Mughals : ख्यातनाम कलावंत नसिरुद्धीन शहा दिवसेंदिवस अधिक वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. त्यांच्या ताज डिव्हायडेड बाय ब्लडचे प्रमोशन त्यांच्याच अंगलट येत आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून नेटकऱ्यांचा राग आपल्यावर ओढावून घेतला आहे. त्याला कारणही तसेच आहे.
मुघलांचा इतिहास आणि ऐतिहासिक घटना यावर नसिरुद्धीन शहा यांनी मतं व्यक्त केले आहे त्यामुळे सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. नेटकऱ्यांनी देखील शहा यांना वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत. शहा यांना इतिहासाची मोडतोड करण्याचा अधिकार कुणी दिला असेही काहींनी विचारले आहे. मुघलांचा एवढा राग येतो तर त्यांनी बांधलेल्या वास्तू पाडून टाका. असेही शहा म्हणाले होते.
Also Read - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
आता तर त्यांनी अकबराला नेहमीच चुकीच्या पद्धतीनं सादरीकरण करण्यात आले असे म्हटले आहे. अकबरानं नव्या धर्माची घोषणा केली होती असे म्हटले जाते. तर हे चुकीचे आहे. त्यानं कधीही नव्या धर्माविषयी टिप्पणी केली नाही. त्याला त्याचा धर्म दीन ए इलाही सुरु करायचा होता.मुघलांविषयी बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आल्याचे शहा यांचे म्हणणे आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी मत मांडले आहे.
अकबराची प्रतिमा फार वेगळी होती. तो एक परोपकारी शासक होता. तो धर्मांध नव्हता. दयाळु आणि व्यापक विचारांचा राजा म्हणून त्याच्याकडे पाहता येईल. अकबराला नवा धर्म सुरु करायचा होता असे बोलले जाते, आपण असे इतिहासाच्या पुस्तकातही वाचतो. मात्र ती गोष्ट तशी नाही. मी जेव्हा बऱ्याच इतिहासकारांशी बोललो तेव्हा मला त्यांनी अकबरानं कधीही नवा धर्म स्थापन करण्याविषयी सांगितले नाही. असे शहा यांनी म्हटले आहे.
लोकांना असे वाटते की, देशाचे जे काही वाईट झाले ते सगळे काही मुघलांनी केले. मला तर हे हास्यापद वाटते. लोकांना अकबर आणि नादिर शाह किंवा बाबरचे पणजोबा तैमूर यांच्यातील जो फरक होता त्याविषयी बोलायला मागत नाही. एकाच दृष्टीकोनातून पाहण्याच्या सवयीनं गोंधळ होतो आहे, त्यांना खलनायक बनवणे चुकीचे आहे. असेही शहा यांनी यावेळी सांगितले.