तब्बल 14 वर्षांनी भारताला ऑस्कर! रहमाननंतर आता RRR ने...|Natu Natu Oscar 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Natu Natu Oscar 2023 RRR Rajamouli Movie won academy awards now history

Natu Natu Oscar 2023 : तब्बल 14 वर्षांनी भारताला ऑस्कर! रहमाननंतर आता RRR ने...

Natu Natu Oscar 2023 RRR Rajamouli Movie won academey awards : डॅनी बॉयल यांच्या स्लमडॉग मिलेनियरला ऑस्करसाठी एक दोन नव्हे तर दहा नामांकनं मिळाली होती. त्यापैकी या चित्रपटाला ८ ऑस्कर मिळाले होते. त्यात प्रसिद्ध भारतीय संगीतकार ए.आर.रहमान यांच्या हातात ऑस्कर पुरस्कार होता. सर्वोत्कृष्ट मुळ संगीत रचना आणि सर्वोत्तम ध्वनीमुद्रण तर सर्वोत्तम गीत यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. आता या इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आरआऱआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर मिळाला आहे. राजामौली यांच्या आरआरआऱ चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला 'बेस्ट ओरिजनल साँग' कॅटेगरीत नॉमिनेशन मिळाले होते. जेव्हा सुरुवातीला या गाण्याला नॉमिनेशन मिळाले तेव्हापासून भारतीय चित्रपट विश्वामध्ये आनंदाला उधाण आले होते. काही झालं तरी यंदा आपल्याला ऑस्कर हुलकावणी देता कामा नये, याची काळजी राजामौलींनी घेतली होती.

Also Read - नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

भारतीय चित्रपट विश्वाला तब्बल १४ वर्षांनी ऑस्कर मिळाला आहे. त्यामुळे या पुरस्काराचे महत्व तितकेच मोठे आहे. यापूर्वी ए आर रहमान यांच्या जय हो या गाण्याला सर्वोत्कृष्ट संगीतासाठीचा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी त्या सोहळ्यामध्ये रहमान यांना देखील लाईव्ह परफॉर्मन्स सादर करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा तर रहमान यांच्या सादरीकरणानं सर्वांना जिंकून घेतले होते. आता राजामौली यांच्या आरआरआऱ चित्रपटातील नाटू नाटू गाण्याचे सादरीकरण ऑस्करच्या मंचावर सादर करण्यात आले.

एवढ्या मोठ्या कालावधीनंतर मिळालेल्या ऑस्करचा आनंद वेगळाच आहे. त्यामुळे त्यांचे सेलिब्रेशनही तितक्याच उत्साहानं होताना दिसते आहे. सोशल मीडियावर तर मीम्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतो आहे. खासकरुन एनटीआर, रामचरण यांच्या नाटू नाटू गाण्याचे रिल्स पुन्हा एकदा व्हायरल झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून नाटू नाटूच्या ऑस्करविषयी चर्चा सुरु होती.

रहमान यांनी रचला होता इतिहास...

रहमान यांनी २००९ मध्ये समस्त भारतीयांना मोठा आनंद दिला होता. स्लमडॉग मिलेनियरला दिलेल्या संगीतासाठी त्यांना ऑस्करनं गौरविण्यात आले होते. यामध्ये बेस्ट ओरिजनल साँगसाठी गुलजार, बेस्ट ओरिजनल साँग स्कोअरसाठी रहमान तर बेस्ट साउंड मिक्सिंगसाठी रसुल पोकुट्टी यांना ऑस्करनं गौरविण्यात आले होते.