Natya Parishad Election: नाट्य परिषदेचा गुलाल कुणाच्या कपाळी.. प्रसाद कांबळी की प्रशांत दामले?

अखिल भारतीय नाट्य परिषदेची निवडणूक अटीतटीची, आज निकाल..
Natya Parishad Election 2023 prasad kamble uday samant prashant damle tough fight result
Natya Parishad Election 2023 prasad kamble uday samant prashant damle tough fight resultsakal

Natya Parishad Election: एखाद्या राजकीय निवडणुकी इतकं महत्व प्राप्त झालेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक आज रविवार 16 एप्रिल रोजी पार पडणार आहे.

अनेक आरोप प्रत्यारोप आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे यंदाची निवणूक विशेष लक्षवेधी ठरली. त्यामुळे नाट्य परिषद निवडणूकीचा गुलाल नेमका कुणाच्या कपाळी लागणार, याची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली आहे.

(Natya Parishad Election 2023 prasad kamble uday samant prashant damle tough fight result)

या निवणुकीत 'रंगकर्मी नाट्य समूह' आणि 'आपलं पॅनल' हे दोन्ही पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले होते. 'रंगकर्मी नाट्य समूह'चे प्रतिनिधित्व अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले करत आहेत तर 'आपलं पॅनल'चे प्रतिनिधित्व निर्माते प्रसाद कांबळी करत आहे.

ही निवडणूक वरकरणी नाट्यकर्मींची असली तरी यंदा राजकीय हस्तक्षेप झाल्याची बरीच चर्चा आहे. त्यामुळे उदय सामंत यांचा दामले गटाला मोठा पाठिंबा आहे असेही बोलले जात आहे. एकीकडे दामले यांच्या गटात सगळे दिग्गज चेहरे आहेत तर कांबळी यांच्या पॅनल मध्ये कलाकारांसह रंगमंच कामगार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक फारच अटीतटीची होऊन बसली आहे.

दोन्ही गटांकडून एकमेकांवर सध्या अप्रत्यक्ष आरोप झाले, नाट्य परिषदेने मागील पाच वर्षात काहीच काम केले नाही असा दावा दामले यांच्या पॅनलने केला. तर दामले हे समूहाने लढणारे असून ही निवडणूक ते केवळ चेहरे दाखवून नाट्यकर्मींची दिशाभूल करत असल्याचेही म्हणणे 'आपलं पॅनल'ने मांडले .

'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे' अध्यक्ष संतोष काणेकर यांनी तर एक पत्र जाहीर करून दामले गटावर सडकून आरोप केले. दामले गटातील काही लोकांनी नाट्य निर्माता संघ फोडला, जबाबदारी झटकून ते पळून गेले मग आता ते नाट्य परिषद कशी सांभाळणार असा आरोप त्यांनी केला होता.

त्यामुळे अखेर या सगळ्या गोष्टींना पूर्ण विराम लागून मतदानाला सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत हे मतदान चालणार असून आज रात्रीच या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com