nawab chacha sirf sameer wankhede ke barey mein hi sochtey hai!क्रांती रेडकर नवाब मलिकांवर पुन्हा बरसली,ट्वीट चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kranti Redkar,Navab Malik
"दहशत असावी तर नवाब मलिकांसारखी" #krantiRedkar# tweet on Navab Malik#samirvankhede#tweet#

दहशत असावी तर समीर वानखेडेंसारखी : क्रांती रेडकर

गेल्या अनेक दिवसांपासून समीर वानखेडे(Samir Vankhede) विरुद्द नवाब मलिक(Navab Malik) अशी खडाजंगी सुरूच आहे. मुंबई हायकोर्टात तर मलिक विरुद्ध वानखेडे हे प्रकरण चांगलेच गाजतेय. समीर वानखेडे यांच्या संपूर्ण कुटुंबियांनीही त्यांच्या बाजूने उभे राहत या प्रकरणात उडी घेतलीय. नवाब मलिकांच्या वकीलाकडून समीर वानखेडेंचे कुटुंब मुस्लिम असून त्यांनी केवळ सरकारी नोकरी लाटण्यासाठी स्वतःला अनुसूचित जातीचे सांगितल्याचा आरोप केला जात आहे. तर समीर वानखेडे यांचे वकील अरशद शेख यांनी ज्ञानदेव वानखेडे यांची बाजू मांडताना तुम्ही आम्हाला कोणत्याही नावाने हाक मारा पण दाऊद म्हणू नका असे प्रतिउत्तर केले आहे. समीर वानखेडे यांच्या शाळेचे प्रमाणपत्र नवाब मलिकांकडून सादर करण्यात आले आहे. सेंट जोसेफ हायस्कूलच्या प्रवेश फॉर्ममध्ये समीर वानखेडेंचे नाव समीर दाऊद वानखेडे असल्याचं दाखवलं आहे. यावर समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिनं मलिकांच्या आरोपाला उत्तर देत समीर वानखेडेंचं शाळेचं प्रमाणपत्र शेअर केले आहे.

हेही वाचा: "मी आईवडिलांना फसवतेय याचं दु:ख,पण...."

आतापर्यंत समीर वानखेडे आणि नवाब मलिकांच्या वकिलांनी बरीच कागदपत्र या प्रकरणात कोर्टात सादर केली आहेत. आता कोर्टाने दोघांनाही यापुढे कोणतेही प्रमाणपत्र सादर करू नका असं स्पष्ट केलं आहे. दोन्हीकडच्या बाजू ऐकून घेतल्यावर 22 नोव्हेंबरला या प्रकरणावर निर्णय दिला जाईलं असं कोर्टाने म्हटलं आहे. आज पुन्हा समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरनं ट्वीट करून त्यात म्हटलंय,' नवाब मलिक रोज समीर वानखेडेंविषयी बोलून,नवनवीन पुरावे सादर करीत आहेत. मला वाटतं ते दिवसभर जणू समीर वानखेडेंना कसं फसवता येईल याचाच विचार करीत आहेत. माझे पती प्रामाणिक अधिकारी आहेत त्यामुळे त्यांना फसवण्यासाठी मलिकांना खूप मेहनत घ्यावी लागतेय.'

क्रांती रेडकर हिच्या ट्वीटवर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

क्रांती तिच्या ट्वीटमध्ये म्हणाली,''वाह!क्या खौफ है,सोते,जागते उठते,बैठते नवाब चाचा सिर्फ समीर वानखेडे के बारे में सोचते है,सुबह हुई नही की ट्वीट शुरू. डर पैदा करो तो ऐसा. पावर ऑफ वन हॉनेस्ट ऑफिसर.'' क्रांतीच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये काहींनी क्रांतीला सपोर्ट केलाय तर काहींनी समीर वानखेडेंच्या विरोधातही भाष्य केलंय. या प्रकरणात नेहमीच नवाब मलिक आणि क्रांती रेडकर सोशल मीडियावरनं एकमेकांना उत्तर देत असतात. आता क्रांतीनं केलेल्या या ट्वीटवर नवाब मलिक काय उत्तर देतात याकडे सगळयांचं लक्ष लागून राहिलं आहे.

loading image
go to top