'मुलं रस्त्यावर आली, तू बंगल्यात झोपतोय!' बॉलीवूडच्या कलाकारानं नवाझुद्दीनला टोकलं | Nawazuddin Shah | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawazuddin Shah

Nawazuddin Shah : 'मुलं रस्त्यावर आली, तू बंगल्यात झोपतोय!' बॉलीवूडच्या कलाकारानं नवाझुद्दीनला टोकलं

Nawazuddin Shah : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन शहा हा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या पत्नीनं आलियानं त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आलियानं नवाझुद्दीनवर जे नाही ते आरोप करुन त्याच्याविषयी वेगळाच प्रचार सुरु केला आहे.

नेटकऱ्यांना, नवाझुद्दीनच्या असंख्य चाहत्यांना देखील आलियानं जे काही आरोप केले आहेत त्यावर विश्वास ठेवणं कठीण जात आहे. याचे कारण बॉलीवूडमध्ये आपल्या संघर्ष आणि कष्टानं स्वताची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणून नवाझुद्दीनला बॉलीवूड ओळखते. प्रचंड संघर्ष करुन बॉलीवूडचा सर्वात महागडा कलावंत म्हणून आता त्याच्याकडे पाहिले जाते.

Also Read - तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

नवाझुद्दीनच्या आईनं देखील सून आलियावर गंभीर आरोप केले आहेत. तिला संपत्तीतून बेदखल करण्याचा तिनं निर्णय घेतला आहे. नवाझुद्दीनच्या मुलांवरुन देखील त्याच्या आईनं आलियावर गंभीर आरोप केले आहेत. सध्या नवाझुद्दीन आणि आलियाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्याबाबत कोर्टानं देखील त्यांना मुलांसाठी एकदा त्यांच्यातील वादावर विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

यासगळ्यात बॉलीवूडचा अभिनेता आणि प्रसिद्ध युट्युबर के आर के अर्थात कमाल राशिद खाननं नवाझुद्दीननं गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता नेटकऱ्यांना वेगळेच प्रश्न पडू लागले आहे. नवाझुद्दीन अरे तुझी मुलं रस्त्यावर आली आहेत आणि तू बंगल्यात कसा काय झोपतो, असा प्रश्न केआरकेनं नवाझुद्दीनला विचारला आहे.

काही दिवसांपूर्वी नवाझुद्दीनच्या भावानं देखील त्याच्यावर मोठे आरोप केले होते. त्यात गेल्या काही वर्षांपासून नवाझुद्दीनच्या स्वभावात बराचसा बदल झाला असून तुम्ही त्याच्या साध्याशा चेहऱ्यावर काही जाऊ नका, त्यामागे एक भयानक व्यक्तिमत्व दडले आहे. असे त्यानं म्हटले होते. यासगळ्यात केआऱके पुन्हा एकदा त्याच्या प्रतिक्रियेमुळे चर्चेत आला आहे.