नवाजुद्दीन सिद्दिकी आता आपली आत्मकथा सांगणार

टीम ई सकाळ
मंगळवार, 25 जुलै 2017

अतिशय मेहनत करून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने आपले करिअर घडवले. आता हा अभिनेता आपली आत्मकथा लिहिणार आहेत. विशेष बाब म्हणजे, हे आत्मकथन मुलाखत वजा असेल. या पुस्तकाचे नाव दि इन्क्रिडिबल लाइफ ऑफ दि ड्रामा किंग ऑफ इंडिया असे असेल. 

मुंबई : अतिशय मेहनत करून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने आपले करिअर घडवले. आता हा अभिनेता आपली आत्मकथा लिहिणार आहेत. विशेष बाब म्हणजे, हे आत्मकथन मुलाखत वजा असेल. या पुस्तकाचे नाव दि इन्क्रिडिबल लाइफ ऑफ दि ड्रामा किंग ऑफ इंडिया असे असेल. 

नवाजुद्दीन सिद्दीकी याबाबात बोलताना नवाज म्हणाला, 'या पुस्तकावर आम्ही जवळपास दोन वर्षे काम करत आहोत. मी एका खूप छोट्या गावातून आलो आहे. तिथून आज मी अभिनेता होण्यापर्यंतचा प्रवास यात मी उलगडला आहे. आता दोन महिन्यांत या पुस्तकाचे अनावरण होईल.'

नवाज खूप छोट्या गावातून आला आहे. मी आज जो काही आहे, त्यात माझे आई वडील आणि माझे गावकरी यांचा मोठा सहभाग आहे. माझ्या आयुष्यातील अनेक गमतीदार गोष्टी लोकांना यातून कळतील असेही तो म्हणाला. नवाजची ही मुलाखत, रितुपर्णा चटर्जी यांनी घेतली आहे. 

Web Title: Nawazuddin siddiqi new book esakal news