वर्णभेदावरील कमेंट्समुळे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी झाला नाराज

टीम ई सकाळ
मंगळवार, 18 जुलै 2017

आज आपण कितीही पुढारलेलो असलो तरी आजही काळा व गोरा असा भेद केला जातो. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला हा अनुभव आला आहे. त्याबद्दल त्याने नाराजी नोंदवली आहे. त्याने केलेल्या ट्विटची बरीच चर्चा सध्या आॅनलाईन विश्वात रंगली आहे. 

मुंबई : आज आपण कितीही पुढारलेलो असलो तरी आजही काळा व गोरा असा भेद केला जातो. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला हा अनुभव आला आहे. त्याबद्दल त्याने नाराजी नोंदवली आहे. त्याने केलेल्या ट्विटची बरीच चर्चा सध्या आॅनलाईन विश्वात रंगली आहे. 

नवाजुद्दीनने केलेल्या ट्विटमध्ये खरेतर तिरकस शेलीत आभार मानले आहे, तो या ट्विटमध्ये म्हणतो, मी काळा आणि फार चांगला दिसणारा नसल्यामुळे गोऱ्या आणि हॅडसम कुणाहीसोबत सूट होत नाही, हे सांगितल्याबद्दल खरेतर मी तुमचे आभार मानतो. पण मी कसा दिसतो यावर मी कधीच लक्ष दिलं नव्हतं.

त्याच्या या ट्विटनंतर त्याला पाठिंबा देणारे अनेक जण पुढे सरसावले. नवाजुद्दीनला हा अनुभव नेमका कधी आला, की त्याला ट्रोलिंगला समोरे जावे लागले हे मात्र त्याने काही सांगितलेले नाही. या कमेंटमुळे तो कमालीचा नाराज झाला असला, तरी आपण त्याकडे कधीच लक्ष दिले नव्हते असेही तो सांगतो. 

Web Title: Nawazuddin siddiqi on twitter esakal news