Nawazuddin Brother: 'अजून किती लोकांना विकत घेणार', आता तर नवाजुद्दीनच्या भावानंचं केला आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawazuddin Brother

Nawazuddin Brother: 'अजून किती लोकांना विकत घेणार', आता तर नवाजुद्दीनच्या भावानंचं केला आरोप

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी याच्या अडचणी वाढतांना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून तो त्याच्या वैयक्तिक आयूष्यामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी आलिया सिद्दीकीनं अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिनं सासरच्या लोकांवर कौटुंबिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्याच्या घरात काम करणाऱ्या मुलीनंही त्याच्यावर आरोप केले. ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यांनतर अभिनेत्यावर टिकाही करण्यात आली.

पण नंतर मोलकरिन सपना रॉबिनने तिच्यावर दबाव टाकण्यात आला होता असं म्हणतं सर्व आरोप मागे घेतले. मी नवाज सरांची हात जोडून माफी मागते. तसं तर मी माफीच्या लायक नाहीच आहे. मी जे काही केलं ते माझ्यावर दबाव टाकण्यात आल्यामुळे केलं. तुमच्यासोबत काही चुकीचं व्हावं असं मला वाटत नाही. सोशल मीडियावर जो व्हिडीओ पाहिला तो चुकीचा आहे. मॅडमनी तुमच्यावर जे आरोप लावलेयत ते सगळे खोटे आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगेन तुम्ही घरी परत या'' मात्र हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नवाजच्या भावाने प्रतिक्रिया दिली.

नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ शमास नवाब सिद्दीकीयाने हाऊसहेल्पच्या माफीची बातमी ट्विट केली आणि लिहिले, 'हे स्क्रिप्टेड आहे. अजून किती खरेदी कराल? बँक बॅलन्स संपू नये..तुझं कामही गडबडलं आहे आणि चित्रपटसृष्टीचे 150 कोटी रुपये तुझ्या रखडलेल्या चित्रपटांमुळे अडकले आहेत. ते बरोबरच आहे - जे लोक रद्दी, दल्ले आणि बकरे विकतात तेच त्याला नरकात घेऊन जातील.' त्याच हे ट्विट सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालं आहे. मात्र, त्यानंतर अभिनेत्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण आता त्यांच्या बोलण्यातून अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत.