Nawazuddin Siddiqui: सख्खा भाऊ पक्का वैरी! नवाजुद्दीन सिद्दीकीला भावानेच आजारी आईला भेटू दिलं नाही.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawazuddin Siddiqui

Nawazuddin Siddiqui: सख्खा भाऊ पक्का वैरी! नवाजुद्दीन सिद्दीकीला भावानेच आजारी आईला भेटू दिलं नाही..

नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावंत आणि लोकप्रिय अभिनेता आहे. पण सध्या तो त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत आहे. त्याचे त्याच्या पत्नीसोबत वाद सुरु आहेत. तिने नवाजवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचे आरोपही तिने केले आहेत.

त्यानंतर नवाजच्या सख्या भावानेही त्याच्यावर आरोप केले होते. तो जसा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तसा तो नाही म्हणतं त्याने नवाजला धारेवर धरलं होतं. यामुळे नवाजने त्याच घर सोडल असून. तो एका हॉटेलमध्ये राहत असल्याच्याही चर्चा होत्या.

दरम्यान आता नवाजला त्याच्या सख्या भावानेच आईला भेटण्यापासून रोखल्याची बातमी समोर आली आहे. काल रात्री नवाजुद्दीन सिद्दीकी वर्सोवा येथील तिच्या बंगल्यावर आईला भेटण्यासाठी पाहचला होता. पण नवाजचा भाऊ फैजुद्दीन याने त्याला आईला भेटण्यापासून अडवलं.कुटुंबात आणखी वाद वाढू नयेत असं त्याच्या आईची इच्छा आहे त्यामुळं नवाजला आजारी आईला भेटण्यापासून रोखलं असल्याचं सांगितलं जात आहे.

पत्नी आणि नवाज यांच्यातील वाद ज्याप्रकारे सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे त्याच्या आई अस्वस्थ आहे आणि आणि त्यामुळेच नवाजची आई गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. या संदर्भात काल रात्री नवाज त्याच्या आईला भेटायला गेला होता पण त्याला गेटवर थांबवण्यात आलं. याचा व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

नवाजने त्याच्या सर्व वडिलोपार्जित मालमत्तेची पॉवर ऑफ अॅटर्नी त्याचा भाऊ अलमासुद्दीनच्या नावावर केली आहे. अल्मासुद्दीन हा वकील आहेत. दुसऱ्या दस्तऐवजात त्याने मृत्यूपत्र केले आहे की तो जिवंत असेपर्यंत त्याच्या मालमत्तेवर त्याचा हक्क असेल. त्यांच्या पश्चात ही संपत्ती त्यांचे भाऊ अल्मासुद्दीन, माजुद्दीन आणि मिन्हाजुद्दीन सिद्दीकी यांच्या नावावर असेल असं नवाजचा वकील प्रशांत शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे.