
Nawazuddin Siddiquiला अखेर मोठा दिलासा! हुंडाबळी खटला फेटाळला मात्र मुलांना...
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या वैयक्तिक आयूष्यामुळं चर्चेत आहे. त्याच्या बायकोने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे भावानेही त्याच्याविरुद्ध वक्यव्य केलं आहे. हि केस आता न्यायालयात सुरु असून नुकतच त्याला या प्रकरणात दिलासा मिळाल्याचं दिसतयं.
त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली हुंडाबळीची याचिका मुंबई न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्याची पत्नी आलियाने त्याच्याविरोधात दोन याचिका दाखल केल्या होत्या, त्या कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत.
नवाजच्या वकिलांच्या सांगण्यानुसार, आपल्या अशिलाविरुद्ध खोटे दावे करत तक्रार दाखल केली होती. मात्र, आलियाच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, नवाजला मुलांचा ताबा दिला जाणार नाही. असं सांगण्यात आलं आहे.
नवाजच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध आणि त्याच्या आईविरुद्ध आयपीसी कलम 498A (हुंडा छळ) आणि कलम 509 (सुरक्षा पुरवण्यासाठी) अंतर्गत मुंबईच्या वर्सोवा पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश मागितले होते.
नवाजचा वकील अदनान शेख आणि दृष्टी खुराना यांनी पीटीआयला सांगितले की, "न्यायालयाने घटस्फोटाची कागदपत्रे सादर केल्यानंतर दोन्ही खटले फेटाळले." आता नवाजला त्याच्या दोन्ही मुलांची कस्टडी मिळणार की नाही हे पाहावं लागेल.
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि जैनब यांनी 2010 मध्ये लग्न केल्याचे सांगितले जात आहे. झैनब ही नवाजची दुसरी पत्नी आहे. दोघांना दोन मुले आहेत. पण लॉकडाऊन दरम्यान अभिनेता आणि जैनब आणि नौबत यांच्यात वाद झाला आणि घटस्फोटापर्यंत पोहोचले.
तर काहीदिवसांपुर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीचे वकील नदीम जफर जैदी यांनी काही आठवड्यांपूर्वी पत्रकार परिषदेत जैनबवर अनेक गंभीर आरोप केले होते. जैनबची एक नाही तर अनेक नावे असल्याचा दावा त्यांनी केला. ती आलिया आहे आणि तिचे नाव कधी अंजली, कधी अंजना पांडे तर कधी कामाक्षा होते असा आरोप त्यांनी केला होता.