नवाझुद्दीन चालला हॉलीवूडला, 'इंडो - अमेरिकन' चित्रपटातून एंट्री

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयामुळे ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्यांमध्ये आवर्जुन घ्यावं असं नाव म्हणजे नवाझुद्दीन सिद्धिकी.
Nawazuddin Siddiqui entry in Hollywood films Cannes 2022
Nawazuddin Siddiqui entry in Hollywood films Cannes 2022 esakal

Bollywood News: बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयामुळे ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्यांमध्ये आवर्जुन घ्यावं असं नाव म्हणजे नवाझुद्दीन सिद्धिकी. या (Bolywood Actor) अभिनेत्यानं कमी कालावधीत मोठं यश संपादन केलं आहे. जाणकार प्रेक्षक, अभ्यासक हे नेहमीच नवाझुद्दीनच्या अभिनयाच्या प्रेमात असतात. त्यानं आजवर ज्या चित्रपटातून काम केलं आहे ते चित्रपट प्रेक्षकांना (Nawazuddin Siddhqui) भावले आहे. सध्या नवाझुद्दीन चांगलाच फॉर्मात आहे. तो त्याच्या चित्रपटासाठी थेट कान्सला गेला आहे. यंदाच्या कान्स 2022 मध्ये त्याला निमंत्रण आहे. तिथं गेल्यावर त्यानं आणखी एक गोड बातमी दिली आहे. ती म्हणजे नवाझुद्दीन हॉलीवूडमध्ये काम करणार आहे. एका अमेरिकन इंडो चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नवाझुद्दीनच्या चाहत्यांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

नवाझुद्दीननं मोठं यश मिळवलं आहे. त्याच्या आतापर्यतच्या करियरमधील ही सर्वात मोठी कामगिरी असल्याचं सांगण्यात येत आहे. अतिशय बिकट आणि संघर्षमय परिस्थितीतून नवाझुद्दीननं आपली वेगळी ओळख बॉलीवूडमध्ये तयार केली आहे. तो सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावर नेहमी आपल्या वेगवेगळ्या लुक्सनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारा नवाझुद्दीन प्रेक्षकांचा आवडता अभिनेता आहे. त्यानं तीन वर्षांपूर्वी सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधून ओटीटीवर एंट्री केली होती. त्या मालिकेतील त्याच्या भूमिकेनं प्रेक्षकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. सेक्रेड गेम्समध्ये त्यानं साकारलेला गणेश गायतोंडे हा अजुनही प्रेक्षकांच्या आवडत्या भूमिकांपैकी एक आहे.

Nawazuddin Siddiqui entry in Hollywood films Cannes 2022
Bollywood V/S South : तुला साऊथचे चित्रपट आवडतात का? रणवीर सिंगचं कडक उत्तर

नवाझुद्दीन हा लक्ष्मण लोपेज नावाच्या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट रॉबर्टो जिरॉल्ट दिग्दर्शित करणार आहे. यावर्षीच्या डिसेंबरपासून अमेरिकेमध्ये त्याच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. ख्रिसमस या विषयावर आधारित हा चित्रपट आधारित आहे. सध्या नवाझुद्दीन हा कान्सच्या रेड कार्पेटवर तिथे जमलेल्या फोटोग्राफर्सला फोटो देण्यात व्यस्त असल्याचे दिसुन आले आहे. बॉलीवूडमध्ये टिकुन राहण्यासाठी केवळ गुड लुकिंग असणं गरजेचं नाहीतर टँलेटं असणं जास्त महत्वाचं आहे हे दाखवुन देणारा नवाझुद्दीन हा हॉलीवूडमध्ये जाणार असल्याचे कळताच त्याच्याविषयीच्या कौतुकाला उधाण आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com