नवाज करतोय मून वॉक

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नवाजुद्दीन सिद्दीकी हा आपल्या हिमतीवर आणि अभिनयावर मोठा झालेला अभिनेता आहे. "नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मधून अभिनयाचे शिक्षण घेऊन झाल्यानंतर नवाजने छोटे-छोटे रोल करायला सुरुवात केली. अगदी वेटरपासून पाकिटमारापर्यंत. "कहानी' आणि "गॅंग्स्‌ ऑफ वासोपूर'नंतर मात्र चित्र बदलले. आता त्याचा आगामी चित्रपट "मुन्ना मायकल' येतो आहे. मध्यंतरी या चित्रपटामध्ये तो टायगरबरोबर डान्स करताना दिसणार आहे, अशी माहिती होती. त्यासाठी तो टायगरकडून डान्सचे धडेही घेत होता. या चित्रपटात एका डान्समध्ये या दोघांना मून वॉक करायचा होता. टायगर डान्सर असल्याने त्याने खूपच सहजतेने मून वॉक केला; पण नवाजला जमता जमेना.

नवाजुद्दीन सिद्दीकी हा आपल्या हिमतीवर आणि अभिनयावर मोठा झालेला अभिनेता आहे. "नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मधून अभिनयाचे शिक्षण घेऊन झाल्यानंतर नवाजने छोटे-छोटे रोल करायला सुरुवात केली. अगदी वेटरपासून पाकिटमारापर्यंत. "कहानी' आणि "गॅंग्स्‌ ऑफ वासोपूर'नंतर मात्र चित्र बदलले. आता त्याचा आगामी चित्रपट "मुन्ना मायकल' येतो आहे. मध्यंतरी या चित्रपटामध्ये तो टायगरबरोबर डान्स करताना दिसणार आहे, अशी माहिती होती. त्यासाठी तो टायगरकडून डान्सचे धडेही घेत होता. या चित्रपटात एका डान्समध्ये या दोघांना मून वॉक करायचा होता. टायगर डान्सर असल्याने त्याने खूपच सहजतेने मून वॉक केला; पण नवाजला जमता जमेना. पण नवाजने मेहनत करणे सोडले नाही. नवाज म्हणतो, की मी कितीही चित्रपटात काम केले असले, तरी अजूनही मी स्ट्रगल करतो आहे. माझ्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर येतात; पण मला चॅलेंज करतील असेच रोल मी करतो.' नवाजुद्दीन सिद्दीकी मुन्ना मायकल या चित्रपटासाठी खूप मेहनत घेताना दिसून येत आहे.

Web Title: Nawazuddin Siddiqui to match steps with Tiger Shroff for 'Munna Michael'