सेटलमेंट झाली वाटतं? बायकोनंतर नवाजचेही बदलले सुर.. म्हणतोय, 'तिच्या बद्दल काहीच तक्रार..' |Nawazuddin Siddiqui |Nawazuddin Siddiqui reacts to controversy surrounding his estranged wife Aaliya Siddiqui viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


Nawazuddin Siddiqui, Nawazuddin Siddiqui news, Nawazuddin Siddiqui wife, Nawazuddin Siddiqui wife letter, Aaliya Siddiqui letter to nawazuddin

Nawazuddin Siddiqui: सेटलमेंट झाली वाटतं? बायकोनंतर नवाजचेही बदलले सुर.. म्हणतोय, 'तिच्या बद्दल काहीच तक्रार..'

Nawazuddin Siddiqui news: आपल्या दमदार अभिनयानं बॉलिवूडमध्ये वेगळ स्थान निर्माण करणारा अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकी. गँग्स ऑफ वासेपूर,बदलापूर, लंचबॉक्स अशा अनेक सिनेमांमधून याशिवाय सेक्रेड गेम्स सारख्या वेबसिरीजमधून तो घराघरात पोहोचला. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

नवाजची बायको आलिया हिने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. तिच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोपही तिने केले आहेत.

मात्र नवाजनेही पत्नीचे आरोप फेटाळून लावले आणि ते निराधार असल्याचे म्हटले. ती केवळ हे पैशासाठी करत असल्याचा आरोप नवाजने केला.

हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहचलं आहे. त्यानंतर न्यायालयाने त्यांना आपसात बोलून मुलांसाठी हा वाद थांबवण्याचा सल्ला देखील दिला होता.

त्यातच दोन दिवसांपुर्वी नवाजची बायको आलियाने एक पत्र लिहून ती आता या प्रकरणातुन माघार घेत असल्याचे संकेत दिले होते.

दोघंही नात्याची नवी सुरवात करु असं देखील तिने या पत्रात म्हटलं होतं. इतकच नाही तर तिने या पत्रात नवाजची माफी मागितली आणि आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी तिने नवाजलाही माफ करण्याचे मान्य केले.

भूतकाळ विसरून आयुष्यात पुढे जाण्याविषयी ती या पत्रात बोलली. मात्र काही वेळीनंतर तिचं अकाउंट हॅक झाल्याचं नवाजच्या भावानं सांगतिलं आणि त्यानंतर ते अकाउंट दिसेनास झालं.

त्याचवेळी नवाजुद्दीन सिद्दीकीही या प्रकरणी आता बोलला आहे. त्याची आलिया बद्दल कोणतीही तक्रार नसल्याचं त्याने सांगितले आहे. अफवा पसरवणारी व्यक्ती एक आहे. त्या एका व्यक्तीकडून ही अफवा आगीसारखी पसरते.

या अफवांमुळेच माझ्या आणि आलियामध्ये गैरसमज वाढले आणि प्रकरण इथपर्यंत पोहोचलं. माझ्या मुलांनी शाळेत जायला सुरुवात करावी अशी माझी इच्छा होती. आता ते शाळेत जाऊ लागले आहेत, मला कशाचीच अडचण नाही. असंही त्याने सांगितलं .

त्यामुळे आता त्याच्यामधील प्रकरण निवरलं आहे का अशा चर्चा सुरु झाल्या असेल.

नवाजने लोकांना त्याच्या आणि कुटुंबाच्या गोपनीयता ठेवण्याच आवाहन केलं आहे. चुकीच्या गोष्टी पसरवू नका आणि नकारात्मक बोलू नका. त्याची कोणतीही तक्रार नाही आणि त्याला आलियासोबतच्या नात्याबद्दल काही नकरात्मक ऐकायचंही नाही असं देखील तो म्हणाला.

जर असं काही झालं असेल तर ती दोघांसाठी चांगली गोष्ट ठरु शकते. नवाजचे चाहते ही बातमी ऐकून खुप खुश आहेत.

नवाज त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तो लवकरच तो निक्की तांबोळीसोबत जोगिरा सरारा या चित्रपटात दिसणार आहे.तो २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.