
Nawazuddin Wife: अर्ध्या रात्री नवाजनं बायको पोरांना काढलं घराबाहेर? व्हिडिओ पोस्ट करत आलिया म्हणाली,..
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पत्नी आलिया यांच्यातील वाद हा आता विकोपाला गेल्याचं दिसतयं. कधी आलिया नवाज वर गंभीर आरोप करते तर कधी त्याचे व्हिडिओ शेअर करत असते. हे प्रकरण आता कोर्टात सुरु आहे.
दरम्यान आज पुन्हा आलियाने रडतांनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातुन तिनं नावजने मध्यरात्री तिला आणि तिच्या दोन्ही मुलांना घराबाहेर काढल्याचा आरोप केला आहे.

आलियाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या व्हिडिओमध्ये आलिया दोन्ही मुलांसोबत बंगल्याबाहेर दिसत आहे. या व्हिडिओत दोन्ही मुलेही रडताना दिसत आहेत.
व्हिडिओत नवाजबद्दल आलिया म्हणाली की, अभिनेता इतका खालच्या पातळीवर जाईल हे तिला कधीच वाटलं नव्हते. त्यांना बंगल्याच्या बाहेर फेकण्यात आलं आहे. आता ती कुठे जाईन हे तिला माहीत नसल्याचं ती म्हणते.
याबरोबर तिनं एक नोटही शेअर केली आहे. आलियाने एक लांबलचक पोस्टमध्ये लिहिलयं की, नवाजचे हे खरे रुप आहे ज्याने आपल्या निरागस मुलांनाही सोडलं नाही. मला अचानक वर्सोवा पोलिस स्टेशनमधून फोन आला. मी तिथे गेली आणि परत आले तेव्हा मला घरातून हाकलून देण्यात आलं. मला घरात जाऊ दिलं जात नव्हतं. तिथे खुप सारे गार्डसही उभे होते.
ती पुढे म्हणाली, "मला आणि माझ्या मुलांना या माणसाने निर्दयीपणे रस्त्यावर राहण्यासाठी सोडून दिले होतं.. माझ्या मुलीला विश्वास बसत नव्हता की तिचे वडील तिच्यासोबत असं काही करू शकतात आणि ती रडत होती." माझ्या एका नातेवाईकाने आम्हाला त्याच्या एका खोलीच्या घरात नेले..मी तो व्हिडिओ शेअर करत आहे ज्यामध्ये तुम्ही या माणसाचा खरा चेहरा पाहू शकतात.