
Nawazuddin Siddiqui: 'कुछ तो गडबड है ' आधी पत्र लिहिलं अन् आता तर नवाजच्या बायकोचं अकाउंट दिसेना!
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याचा आणि त्याच्या बायकोचा वाद हा आता सर्वांनाच माहित झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्याची आणि त्याच्या पत्नीची भांडणं हा सोशल मीडियावर चर्चेत आलेला मुद्दा बनला होता. नवाझुद्दीनच्या पत्नीनं आलियानं त्याच्यावर कौटूंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे.
त्याच्यातील वाद कोर्टापर्यंत पोहचला त्यानंतर कोर्टानं त्यांना आपआपसातच बोलुन हा वाद मिटवण्याचा सल्ला दिला होता.
मात्र तरीही दोघांतील हा वाद संपण्याचं नाव घेत नव्हता आता वाद टोकाला गेला असताना नवाझची बायको आलियाने नवाझसाठी एक पत्र लिहलं आणि दोघांच्या नात्याची नवी सूरूवात करण्याचे संकेत दिले. हे पत्र थोड्यावेळातच सोशल मिडियावर व्हायरल झालं आणि त्यांनतर पुन्हा नवाज चर्चेत आला.
तिने या पोस्टच्या माध्यमातून आलिया नवाजची माफी मागताना दिसत आहे. नवाजची पत्नी भूतकाळ विसरून आयुष्यात पुढे जाण्याविषयी बोलत आहे.
आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी तिने नवाजलाही माफ करण्याचे मान्य केले आहे. नवाजच्या पत्नीने तिचे हिंदीतील पत्र शेअर केले आहे. ज्यात त्यांनी बरंच काही लिहिलं आहे.
व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, आलिया लिहिते की, आयुष्य हे पुढे जाण्याचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांत त्यांच्यामध्ये जे काही घडले ते तिला विसरायचं होतं.
इतकच नाही तर तिने माफी मागितली आणि तिला आता पुढे जायचं आहे. आलियाने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक नवीन सुरुवात करण्याबद्दल बोलली आणि अशा चुका पुन्हा नाही असंही सांगितलं आहे.
आलियाची ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिचे इंस्टाग्राम अकाउंट आता दिसत नाही. त्यामुळे तिचे हे अकाउंट कुणीतरी हॅक केले असून आता ते डिलिट केले असल्याच बोललं जात आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया युजर्सनी या पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.
आलियाच्या या पोस्टवर कमेंट करताना नवाझचा भावाने आलियाचं अकाउंट हॅक झाल्याचं सांगतिलं आहे.