Nawazuddin Siddiqui: "ज्या व्यक्तीच्या नजरेत...", नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने शेअर केला आश्चर्यकारक व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nawazuddin siddiqui and aaliya siddiqui

Nawazuddin Siddiqui: "ज्या व्यक्तीच्या नजरेत...", नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने शेअर केला आश्चर्यकारक व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. खरं तर, अभिनेता आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यात सुरू असलेला वाद आता कोर्टात पोहोचला आहे. त्यानंतर नवाजुद्दीनच्या आईनेही त्याच्या पत्नीविरोधात एफआयआर दाखल केली होती.

त्याचवेळी, नुकताच या अभिनेत्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जे खूपच आश्चर्यकारक आहे. अभिनेत्याच्या पत्नीने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

आलिया सिद्दीकीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवाजुद्दीनसोबत बोलताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती घराच्या आत बोलत आहे तर नवाजुद्दीन गेटबाहेर उभा आहे. आलियाने या व्हिडिओसोबत एक लांबलचक कॅप्शनही लिहिले आहे. ज्यामध्ये तिने सांगितले की, "ज्या व्यक्तीच्या नजरेत माझी 18 वर्षे किंमत नाही अशा व्यक्तीला मी 18 वर्षे दिल्याचा मला खेद वाटतो..सर्व प्रथम मी त्याला 2004 मध्ये भेटले आणि आम्ही दोघे एकता नगर, चारकोप, म्हाडा, मुंबई येथे राहतो".

"1970 मध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आणि आम्ही जिथे तो, मी आणि त्याचा भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी एका खोलीत एकत्र राहत होतो.. तेव्हा मला खात्री होती की तो माझ्यावर प्रेम करतो आणि मला नेहमी आनंदी ठेवेल... मग आम्ही एक वर्ष डेट केले. 2010 मध्ये लग्न केले आणि 1 वर्षानंतर मी मुलाला जन्म दिला".

आलियाने पुढे लिहिले की, "त्यावेळी मी माझ्या आईने मला दिलेला फ्लॅट विकला आणि त्याच पैशात नवाजला एक कार (स्कोडा फॅबिया) देखील भेट दिली, जेणेकरून त्याला बसमध्ये प्रवास करावा लागू नये. आणि आता इतक्या वर्षांनी तो पूर्णपणे बदलला आहे. हा माणूस कधीच महान व्यक्ती नव्हता..त्याने नेहमी त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा, त्याच्या एक्स वाईफचा अपमान केला आणि आता तो माझा अपमान करत आहे आणि त्याच्या मुलांनाही टार्गेट करत आहे".

"एखादी व्यक्ती इतक्या खालच्या पातळीला कसं काय जाऊ शकते.जेव्हा प्रत्येक कागदपत्र आणि पुरावे हे सिद्ध करतात की या व्यक्तीने मला त्याची पत्नी म्हटले आहे. फसवणूक करणारा हा कोणत्याही जातीचा असू शकतो आणि ज्याचे पालनपोषण चांगले आहे तो कधीही फसवणूक करणार नाही.म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की कोणत्याही व्यक्तीच्या धर्माने जाऊ नका".

नवाजुद्दीनची पत्नी आलियाने यापूर्वी अभिनेता आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. ती म्हणाली होती की, मला माझ्याच घरातल्या खोलीत बंद करून ठेवले आहे. नवाजुद्दीनबद्दल सांगायचे तर, त्याने अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.