
नवाजची 3 लग्न..त्यानं वहिनीला गरोदरपणात मारली लाथ! मानहानीचा खटला करताच शमासचे पुन्हा 11 गंभीर आरोप
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा सध्या त्याच्या वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याने नुकताच त्याचा धाकटा भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी आणि पत्नी आलिया सिद्दीकी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे.
त्याने भावावर पैशांची अफरातफर केल्याचा आणि पत्नीचे आधीच लग्न झाल्याचं त्यांन आरोपात म्हटलं आहे.
आता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावने पुन्हा नवाजवर पलटवार केला आहे. शमसुद्दीन सिद्दीकीने ट्विटरवर एक लांबलचक विधान लिहिले आहे.
त्याने नवाजुद्दीन सिद्दीकीवर गंभीर आरोप केले आहेत. ज्यामध्ये त्यांने खोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केल्याचे सांगितले.
शमसुद्दीन सिद्दीकीने नवाजवर केलेल्या आरोपात तीन लग्न केल्याचा दावा केला आहे. त्यापैकी एक लग्न लॉकडाऊन दरम्यान झालं होतं.
इतकच नाही तर नवाजन त्याच्या वहिनीसोबत गैरवर्तन केले आणि तिच्या गरोदरपणात तिला लाथ मारल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
त्याचबरोबर त्याने नवाजच्या संपत्ती आणि मालमत्तेवरही त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.
नावजच्या भावाने त्याच्यावर एक दोन नव्हे तर तेरा आरोप केले आहेत.
1. नवाजने तीन लग्न केली आहेत आणि त्यातल एक लॉकडाऊनमध्येच केले आहे.
2. वहिनी आफरीनला गरोदरपणात लाथ मारली , गुन्हा दाखल.
3. MeToo चे आरोप लागले आहेत.
4. त्यांच्या पुस्तकावरही वाद झाला होता.
5.सोसायटीच्या पार्किंगमध्ये हिना खान आणि सोनी दांडेकर यांनी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय.
6. सख्खा भाऊ अलमसुद्दीन सिद्दीकीने डेहराडूनमध्ये दोन एफआयआर नोंदविले आहेत.
7. भाची साशा सिद्दीकीच्या कुटुंबीयांनीही नवाजवर आरोप केले.
8. कर्मचाऱ्यांवर अत्याचार करतो त्यांना मारहाण करतो
9. जाहिरातीशी संबंधित प्रकरण
10. कराशी संबंधित प्रकरण
11. कौटुंबिक जमिनीचा वाद असे अनेक आरोप त्याने त्याच्या ट्विटमध्ये केले आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याचा भाऊ शमसुद्दीन आणि माजी पत्नी अंजना पांडे उर्फ आलिया यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे.
नवाजुद्दीनने केलेल्या भ्रामक दाव्यांमुळे बदनामी आणि छळ केल्याबद्दल नुकसानभरपाई म्हणून 100 कोटी रुपयांची मागणी केली आहे.
नवाजच्या वतीने वकील सुनील कुमार यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर आता ३० मार्च रोजी सुनावणी होणार आहे.