वादानंतर कुण्या दुसऱ्यासोबतच दिसली नवाजची बायको! व्हिडिओ व्हायरल Nawazuddin Siddiqui Wife |nawazuddin siddiqui's wife aaliya seen with a man netizens ask who is mystery man video viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawazuddin Siddiqui, Nawazuddin Siddiqui news, Nawazuddin Siddiqui wife, Nawazuddin Siddiqui wife letter, Aaliya Siddiqui letter to nawazuddin

Nawazuddin Siddiqui Wife: वादानंतर कुण्या दुसऱ्यासोबतच दिसली नवाजची बायको! व्हिडिओ व्हायरल

गँग्स ऑफ वासेपूर,बदलापूर, लंचबॉक्स अशा अनेक सिनेमांमधून याशिवाय सेक्रेड गेम्स सारख्या वेबसिरीजमधून तो घराघरात पोहोचलेला आपल्या दमदार अभिनयानं बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करणारा अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

नवाजची बायको आलिया हिने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. तिच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोपही तिने केले होते.

ते प्रकरणही खुप गाजलं आणि त्यानंतर त्याने त्याची आलिया बद्दल कोणतीही तक्रार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे आता या दोघांमध्ये सगळं ठिक असल्याच्या चर्चाही सुरु झाल्या होत्या.

दरम्यान, आलिया सिद्दीकीने लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक 'मिस्ट्री मॅन' देखील दिसत आहे.

त्यामुळे आलियाच्या आयुष्यात आणखी नव्या कुणाची एंट्री झाली असल्याच बोलल जात आहे. नेटकरी तिला अनेक प्रश्न विचारला आहे.

आलिया सिद्दीकीने शनिवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये ती दुसऱ्या कुणासोबत तरी वेळ घालवतांना दिसली.

काही ठिकाणी एक व्यक्ती देखील दिसत आहे, जिच्यासोबतची जवळीक पाहून चाहते तिला कमेंट करत आहेत. प्रत्येकाला एकच प्रश्न पडतो की हा 'मिस्ट्री मॅन' कोण आहे?

Nawazuddin Siddiqui Wife:

Nawazuddin Siddiqui Wife:

आलियाने हा व्हिडिओ शेअर केला मात्र त्या पोस्टला काहीही कॅप्शन लिहिले नाही. त्याचबरोबर तो व्यक्ती कोण आहे हे देखील सांगितलेलं नाही. त्यामुळे आता या व्हिडिओला नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

नवाजची बायको आलिया हिने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. तिच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोपही तिने केले आहेत.

मात्र नवाजनेही पत्नीचे आरोप फेटाळून लावले आणि ते निराधार असल्याचे म्हटले. ती केवळ हे पैशासाठी करत असल्याचा आरोप नवाजने केला.

हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहचलं आहे. त्यानंतर न्यायालयाने त्यांना आपसात बोलून मुलांसाठी हा वाद थांबवण्याचा सल्ला देखील दिला होता.