
Nawazuddin Siddiquiनं बायकोला घराबाहेर काढलं नाही तर..Viral Videoची कहाणी वेगळीच! आता दुसरा व्हिडिओ समोर
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही केल तरी त्याचा आणि त्याच्या पत्नीचा वाद कमी होण्याच नावं घेत नाही आहे. काही दिवसांपुर्वी त्याच्या पत्नीनं सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला.
त्यात तिनं नवाजने अर्ध्या रात्री तिला आणि मुलांना घराबाहेर काढलं असं सांगितलं. तो व्हिडिओ बराच व्हायरल झाला. मात्र त्यानंतर नवाजनेही त्याची बाजू मांडली आणि त्याच्या माजी पत्नी आलियाच्या आरोपांवर उत्तर दिले.
यातच आता पुन्हा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे नवाजच्या बायकोचं खोट सर्वांसमोर आलं आहे. जुण्या व्हायरल व्हिडिओत तिनं दावा केला होता की जेव्हा पोलिस स्टेशनला जावुन परतल्यानंतर तिला बंगल्यात जावु देण्यात आलं नाही.
गार्ड्सने तिला अडवलं आणि ती रात्री रस्त्यावर आली. आता कुठे जावं असा प्रश्न तिच्या समोर आहे. तो व्हिडिओ खुपच भावनिक होता. तिची मुलं रडत होती. मात्र आता त्या दिवशीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये सिक्युरिटी स्टाफही आलियाशी बोलतांना दिसते. स्टाफमधील महिला आलियाला बोलतेय की, 'घरात फक्त मुलांनाच येण्याची परवानगी आहे. तुम्ही आत येवु शकत नाहीत. नावजच्या आईने जी घराची मालकीन आहे, त्यांनी आत येण्यास मनाई केली आहे. नवाजच्या आईला तिच्यापासून समस्या आहे.'
यावर आलिया म्हणते, 'घराचा मालक नवाज आहे. जो माझा नवरा आणि या मुलांचा बाप आहे.' यावर पुन्हा स्टाफ म्हणते की, 'मुलांना परवानगी आहे. फक्त आलियाचं घरात जावू शकत नाहीत.'
तर दुसरीकडे आता नवाजुद्दीनच्या भावानेही गंभीर आरोप केले आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ शमास सिद्दिकी याने दावा केला आहे की, अभिनेता रोज आपल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करतो. पुरावा म्हणून त्याने एक फोन रेकॉर्डिंगही सोशल मीडियावर शेअर केले आहे.
यावर सर्व प्रकरणावर नवाजनं याआधी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत लिहिले होते की, त्यांचा आणि आलियाचा अनेक वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे आणि ते फक्त मुलांमुळे एकत्र आहेत.
नवाजुद्दीनने असेही म्हटले होते की, आलियाने आपल्या मुलांना 45 दिवसांपासून बंद करुन ठेवलं आहे. ती त्यांना शाळेतही जाऊ देत नाही. नवाजुद्दीनच्या म्हणण्यानुसार, तो आलियाला दर महिन्याला 10 लाख रुपये देत आहे. आलिया जे काही करतेय ते फक्त पैशासाठी करतेय.