'भारती आता कसं वाटतयं',नेटक-यांनी उडवली टर 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 22 November 2020

नेटक-यांनी मीम्स तयार करुन त्यातून तिची टर उडवली आहे. भारतीला अटक करण्यात आल्यानंतर प्रसिध्द कॉमेडियन कपिल शर्माची काय प्रतिक्रिया असेल, यावरुन नेटक-यांनी गंमतीदार विशेषणांतून भारतीची टिंगल केली आहे.

मुंबई - कॉमेडियन म्हणून ओळख असलेल्या भारती सिंह हिला एनसीबीकडुन अटक करण्यात आली. तिलाच नव्हे तर तिच्या पतीलाही अटक केली आहे. आपल्या शो मधून वेगवेगळ्या सेलिब्रेटींची चेष्टा मस्करी करणा-या भारतीवर आता सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे.

नेटक-यांनी मीम्स तयार करुन त्यातून तिची टर उडवली आहे. भारतीला अटक करण्यात आल्यानंतर प्रसिध्द कॉमेडियन कपिल शर्माची काय प्रतिक्रिया असेल, यावरुन नेटक-यांनी गंमतीदार विशेषणांतून भारतीची टिंगल केली आहे.भारतीच्या अटकेनंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया काय असेल यावरून मीम्स व्हायरल होत आहेत. चार तासांच्या चौकशीनंतर केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) अखेर कॉमेडी क्वीन भारती सिंगला अटक केली.

तिच्या कार्यालय आणि घरात एनसीबीने टाकलेल्या छाप्यात गांजा सापडला आहे. त्यानंतर भारती हिचा पती हर्ष लिंबाचिया याचीही एनसीबीकडून चौकशी सुरु होती. त्यानंतर तब्बल 18 तासांच्या चौकशीनंतर भारती सिंगचा पती हर्ष लिंबाचियालाही एनसीबीनं अटक केली आहे.  यासगळ्या प्रकरणाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले आहेत. त्यावरुन भारती आणि तिच्या पतीला ट्रोल करण्यात आले आहे.

Image

बॉलीवूडमधील काही प्रसिध्द चित्रपटांमधील संवाद, त्यातील कलाकांरांच्या नावाने, तिच्यावर टीका सुरु झाली आहे. याचे एक महत्वाचं कारण म्हणजे भारती ‘द कपिल शर्मा शो’मध्ये काम करत होती.  एनसीबीला मिळालेल्या माहितीच्या आधारे खार दांडा येथे छापा टाकून 21 वर्षीय संशयित वितरकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे एलएसडीचे 15 ब्लॉट्स, 40 ग्रॅम गांजा आणि नाट्राझेपम  सापडले.

Image

याप्रकरणी आरोपीची चौकशी आणि इतर माहितीच्या आधारे कॉमेडी क्वीन भारती सिंगचे घर आणि प्रोडक्शन कार्यालयात एनसीबीने छापे मारले. त्यात 86.5 ग्रॅम गांजा सापडला आहे. त्यानंतर त्यांना दोघांना एनसीबी कार्यालयात नेण्यात आले. भारती मर्सीडिज कारमधून तर हर्षला एनसीबीच्या वॅनमधून कार्यालयात नेण्यात आले. 

Image

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCB arrested popular comedian Bharti Singh trolled on social media