esakal | श्वेता तिवारीच्या मदतीला राष्ट्रीय महिला आयोग
sakal

बोलून बातमी शोधा

Shweta Tiwari

श्वेता तिवारीच्या मदतीला राष्ट्रीय महिला आयोग

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिध्द अभिनेत्री श्वेता तिवारीची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. तिला आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीकडून अत्याचाराला सामोरं जावं लागल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे श्वेता तिवारीची चर्चा सुरु झाली. सोशल मीडियावरही त्याबाबतच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी श्वेता आणि तिच्या पतीतील भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर श्वेताच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर कमेंट्स दिल्या होत्या.

आता एनसीडब्ल्युनं (नॅशनल कमिशन ऑफ वुमन्सनं) (National Commission for Women ) राष्ट्रीय महिला आयोगानं मुंबई पोलिसांना त्या घटनेची तातडीनं दखल घेण्यास सांगितले आहे. श्वेताच्या बाबत घडलेला प्रकार नेमका काय आहे याचा अहवाल पाठवण्याच्या सुचना केल्या आहेत. श्वेताचा पूर्वाश्रमीचा पती अभिनव कोहलीनं (Abhinav Kohli) तिला शाररिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता. अभिनवनं त्यांच्या चार वर्षांच्या मुलाला तिच्याकडून हिसकावून घेतल्याचा आरोपही त्यात करण्यात आला आहे.

श्वेताच्या (actress Shweta Tiwari) प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतली आहे. श्वेतानं आपल्याबाबत जो कौटूंबिक हिंसाचार झाला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चाही झाली होती. आयोगानं मुंबई पोलिसांना एक पत्र पाठवले आहे. त्यात असे म्हटले आहे, श्वेता तिवारी प्रकरणाची गंभीरतेनं दखल घ्यावी. आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी श्वेताच्या बाबत जो प्रकार घडला आहे त्याची चौकशी करण्याच्या सुचना मुंबई पोलिसांना दिल्या आहेत.

हेही वाचा: कोरोनातून बरं व्हायचयं?, समीरानं सांगितलं डायट, काय ते जाणून घ्या...

हेही वाचा: हरभजनला हवं होतं रेमडेसिव्हिर, सोनु सूद मदतीला धावला...

आमच्याकडे जो व्हिडिओ आला आहे त्यात श्वेताच्या (actress Shweta Tiwari) पतीनं तिला शाररिक व मानसिक त्रास दिल्याचे दिसून येत आहे. याशिवाय त्यात त्यांच्या लहान मुलालाही त्या दोघांमधील वादाचा सामना करावा लागला आहे. (Abhinav Kohli physically abusing her and son Reyansh) हे प्रकरण गंभीर असून त्याची तातडीनं दखल घेण्यात य़ावी असं आयोगाच्या अध्यक्षा रेखा यांनी म्हटलं आहे.

loading image