Neena Gupta: मी म्हणजे काय सार्वजनिक मालमत्ता.. निना गुप्ता यांचं धक्कादायक विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

neena gupta, marathi news

Neena Gupta: मी म्हणजे काय सार्वजनिक मालमत्ता.. निना गुप्ता यांचं धक्कादायक विधान

नीना गुप्ता कायम त्यांच्या विविध गोष्टींमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. नीना गुप्ता त्यांच्या रोखठोक आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. नुकताच नीना गुप्ता यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळे पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत.

हेही वाचा: Anant Ambani-Radhika Merchant Engagement: अनंत अंबानीचा लग्नाचा अल्बम पाहिला का?

नीना गुप्ता यांनी नुकतीच मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये भेट दिली. नेहरू सेंटरच्या इंडिया आर्ट्स फेस्टिव्हलला त्यांनी भेट दिली. या फेस्टिवलमध्ये सध्या जे चित्रप्रदर्शन सुरु आहे ते पाहण्यासाठी नीना गुप्ता गेल्या होत्या. इतरही नागरिक हे फेस्टीवल पाहण्यासाठी आले होते.

हेही वाचा: Amitabh Bachchan: दीपिका नंतर आता अमिताभ फुटबॉलच्या मैदानात.. बिग बी दिसताच रोनाल्डोनं...

याच लोकांमधील एका माणसाने सहज चालता चालता नीना गुप्ता यांचा एक फोटो काढला. नीना यांनी हे पाहिलं आणि त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की, “लोक न विचारता फोटो काढतात, मी तर सार्वजनिक मालमत्ता आहे. ठीके काही हरकत नाही. आहे मी ”

या व्हिडिओखाली नीना गुप्ता यांच्या फॅन्सनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी नीना गुप्ता यांना पाठिंबा दिलाय. नीना गुप्ता यांच्या रोखठोक भूमिकेवर आणि ठाम म्हणण्याचं कौतुक केलंय. एकूणच सेलिब्रिटी खुलेआम वावरत असताना त्यांचे असे फोटो काढणं चुकीचं आहे,असं मत नीना गुप्ता यांच्या फॅन्सने व्यक्त केलंय.

नीना गुप्ता गेली अनेकवर्ष सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. बॉलिवूडमधील एक दर्जेदर अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. काहीच दिवसांपूर्वी ‘वध’ या सिनेमात झळकल्या होत्या. अभिनेता संजय मिश्रा यांच्यासोबत नीना गुप्ता यांनी काम केलं हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला असला तरीही समीक्षकांनी या सिनेमाची वाहवा केली.

या सिनेमाआधी अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच नीना गुप्ता ‘उंचाई’ आणि ‘गुडबाय’ या सिनेमात दिसल्या. याशिवाय अनुपम खेर यांच्यासोबत नीना गुप्ता 'शिवशास्त्री बलबोवा' या आगामी सिनेमात नीना गुप्ता झळकणार आहेत.