रिद्धिमा कपूरच्या बर्थडेनिमित्त नीतू कपूर आणि आलिया-रणबीरने केला धमाकेदार डान्स

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 15 September 2020

रिद्धिमाची आई नीतू कपूर आणि आलिया भट्टने तिचा वाढदिवस स्पेशल बनवण्याची पूर्ण तयारी केली होती. या स्पेशल बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

मुंबई- दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी आज तिचा ४० वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. पहिल्यांदाच रिद्धिमाचे वडिल तिला शुभेच्छा देण्यासाठी तिच्यासोबत नाहीयेत. मात्र रिद्धिमाची आई नीतू कपूर आणि आलिया भट्टने तिचा वाढदिवस स्पेशल बनवण्याची पूर्ण तयारी केली होती. या स्पेशल बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

हे ही वाचा: कंगनाचं डोकं ठिकाणावर? भांडण्याच्या नादात दादासाहेब फाळकेंच्या नावाचा केला चूकीचा उच्चार​

या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांच्याव्यतिरिक्त आदर जैन, अरमान जैन आणि कुटुंबातील इतर सदस्य डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या व्हिडिओत सगळेजण ऋषी कपूर यांच्या आप जैसा कोई मेरे जिंदगी में आए या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करत आहे. यात रणबीर आणि आलियाची जोडी डान्स करताना खूप क्युट दिसत आहे. रिद्धिमाने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलंय, 'बेस्ट बर्थ डे सरप्राईज. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.' मात्र हा व्हिडिओ काही वेळानंतर इंस्टाग्रामवरुन गायब झालेला दिसून आला.

Neetu Kapoor, Ranbir Kapoor, Alia Bhatt, Bharat Sahni Dance To Surprise Riddhima  Kapoor On Birthday

Ranbir Kapoor, Alia Bhatt And Neetu Kapoor's Groovy Surprise For Birthday  Girl Riddhima Kapoor Sahni

रिद्धिमाने आलिया भट्ट, करिना कपूर आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत रात्री उशीरा बर्थडे सेलिब्रेट केला आणि या स्पेशल मुमेंटचे फोटो सोशल मिडियावर देखील शेअर केलेत. या फोटोत करिनाचं प्रेग्नेंसीमुळे वजन वाढल्याचं दिसून येतंय. नीतू कपूर आणि आलिया-रणबीर यांचा डान्सवर चाहते फिदा झाले आहेत. रिद्धिमा आणि कपूर कुटुंबिय यावेळी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांना मिस करताना दिसून आले.    

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Family 

A post shared by Riddhima Kapoor Sahni (RKS) (@riddhimakapoorsahniofficial) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: neetu kapoor alia grooving to the tunes on special song to make riddhima kapoors birthday special