Neetu Kapoor यांनी मुंबईत खरेदी केलं आलिशान घर.. किंमत ऐकून बसेल ४४० व्हॉल्टचा झटका.. Neetu Kapoor New Home Price | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Neetu Kapoor New Home

Neetu Kapoor यांनी मुंबईत खरेदी केलं आलिशान घर.. किंमत ऐकून बसेल ४४० व्हॉल्टचा झटका..

Neetu Kapoor: 80 च्या दशकापासून आजपर्यंत बॉलीवूडमध्ये आपल्या उत्तम अभिनयानं जोरदार बॅटिंग करणाऱ्या नीतू कपूर आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत असतात. पण यावेळी अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नाही तर एका मोठ्या इन्व्हेस्टमेंटमुळे लाइमलाइटमध्ये आल्या आहेत.

बातमी आहे की नीतू कपूर यांनी मुंबईत एक आलिशान घर खरेदी केलं आहे,ज्याची किंमत १७ करोड रुपये असल्याचं बोललं जात आहे. (Neetu Kapoor New Home 4 BHK Apartment in mumbai worth 17 crores)

हिंदुस्थान टाईम्सच्या लेटेस्ट रिपोर्टनुसार,नीतू कपूर यांनी मुंबईच्या एका उच्चभ्रू वस्तीत एक महागडी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. रिपोर्ट्सनुसार, नीतू कपूर यांनी मुंबईचा बिझनेस एरिया असलेल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक ४ बीएचके अपार्टमेंट खरेदी केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,या अपार्टमेंटची किंमत जवळपास १७ करोड इतकी आहे. नीतू कपूर यांचा हा फ्लॅट सनटेक रिअॅलिटीचा अल्ट्रा लग्झरी प्रोजेक्ट असलेल्या सिग्निया आइल इमारतीच्या १७ व्या माळ्यावर आहे. ही इमारत १९ मजल्यांची आहे.

नीतू कपूर यांनी १० मे रोजी या फ्लॅटचं रजिस्ट्रेशन केलं आहे. या फ्लॅटच्या स्टॅंप ड्युटीसाठी अभिनेत्रीनं १.०४ करोड रुपये खर्च केले आहेत. बोललं जात आहे की नीतू कपूरचं हे घर ३,३८७ स्क्वेअर फीटचं आहे आणि घरासोबत अभिनेत्रीनं तीन गाड्यांच्या पार्कींगसाठी देखील जादा पैसे भरले आहेत.

काही दिवसांपूर्वी नीतू कपूर यांची सून आलिया भट्टनं देखील दोन-चार प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवले होते. ज्यामध्ये एका फ्लॅटसाठी अभिनेत्रीनं ३७.८० करोड खर्च केले होते. हा फ्लॅट आलिया भट्टच्या प्रॉडक्शन हाऊसने ब्रांद्रा पश्चिमेत खरेदी केला आहे.

बातम्या आहेत की आलिया भट्टनं दोन खरेदी केलेले फ्लॅट्स आपली बहिण शाहीन हिला गिफ्ट केले आहेत. ज्यांची किंमत ७.६८ करोड रुपये प्रत्येकी असल्याचं बोललं जात आहे.