‘मिले हो तुम हमको बडे नसीबो सें,चुराया है मैंने दिल के लकीरो से' 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 25 October 2020

लग्न विधींसाठी नेहा व रोहनप्रीतच्या पोशाखात गुलाबी रंगसंगती पाहायला मिळाली. रोहनप्रीतने गुलाबी रंगाची शेरवानी तर नेहाने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. त्यानंतरच्या कार्यक्रमासाठी नेहाने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

मुंबई - बॉलीवूडची प्रख्यात गायिका नेहा कक्करचे लग्न हा सध्या सोशल मीडियावरील ट्रेंडिंगचा विषय ठरत आहे. तिच्या साखरपुड्याचे फोटो असु द्यात किंवा हळदी समारंभाचे, त्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडला आहे. आता नेहाने तिच्या लग्नाचा व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात ती तिच्या आवडीच्या गाण्यावर डान्स करत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून तिच्या नृत्याला चाहत्यांनी लाईक केलं आहे.

‘मिले हो तुम हमको बडे नसीबो सें, चुराया है मैंने दिल के लकीरो से'   हे नेहा चे प्रसिद्ध गाणं आहे. तरुणाईच्या विशेष पसंतीचे असणा-या या गाण्याने नेहाच्या लग्नात रंगत आणली. लग्न विधींसाठी नेहा व रोहनप्रीतच्या पोशाखात गुलाबी रंगसंगती पाहायला मिळाली. रोहनप्रीतने गुलाबी रंगाची शेरवानी तर नेहाने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. त्यानंतरच्या कार्यक्रमासाठी नेहाने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. स्वत:च्या लग्नात नेहाने रोहनप्रीतसाठी ‘मिले हो तुम हमको’ हे तिचं प्रसिद्ध गाणं गायलं आणि त्यानंतर दोघांनी मिळून डान्ससुद्धा केला.

नेहा कक्करने गायक रोहनप्रीत सिंगशी २४ ऑक्टोबर रोजी दिल्लीत लग्नगाठ बांधली. आनंद कारज पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला नेहा व रोहनप्रीतचे कुटुंबीय व मोजके मित्रमंडळी हजर होते. लग्नानंतर पंजाबमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. 
रोहनप्रीत सिंग हा गायक असून ‘मुझसे शादी करोगे’ या रिअॅलिटी शोमध्ये तो झळकला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Kudi tu chocolate hai @nehakakkar #nehakakkar @tonykakkar #tonyakkkar #NehuPreet #Nehurohu #Love #beautifulBride #NehuDaVyah

A post shared by Pallavi (@neheart_pallavi) on

या शोमध्ये त्याने शेहनाज गिलला लग्नासाठी विचारले होते. तसेच काही दिवसांपूर्वी त्याने आणि नेहाने एका अल्बममध्ये एकत्र काम केले आहे. नेहाच्या लग्नाचे विविध फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happiness @nehakakkar #nehakakkar @rohanpreetsingh #rohanpreetsingh #Nehurohu #NehuPreet #wedding

A post shared by Pallavi (@neheart_pallavi) on

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neha Kakkar And Rohanpreet Singh Wedding A Special Performance By The Couple