नेहा कक्करच्या नवऱ्याला गंडा.. हॉटेलमधून लाखोंचा ऐवज चोरीला

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिचा पती रोहनप्रीत एका हॉटेलमध्ये मुक्कामाला असताना ही चोरी झाली.
Neha Kakkar's  husband Rohanpreet Singh robbed
Neha Kakkar's husband Rohanpreet Singh robbedsakal

Neha Kakkar's husband Rohanpreet Singh robbed : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिता नेहा कक्कर (neha kakkar) वर्षभरापूर्वी विवाहबंधनात अडकली. तिचा पती रोहनप्रीत सिंग (rohanpreet singh) हा देखील उत्तम गायक आहे. या दोघांची जोडी बाॅलिवूडमध्ये विशेष लोकप्रिय आहे. ते दोघे नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी संपर्कात असतात. पण यावेळी ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. रोहनप्रीत सिंगचे लाखोंचे सामान एका हॉटेलमधून चोरीला गेले आहे.

Neha Kakkar's  husband Rohanpreet Singh robbed
रानबाजार : १८ वर्षांखालील मुलांनी पाहू नये असा प्राजक्ता आणि तेजस्विनीचा बोल्ड सिन

शुक्रवारी रात्री रोहनप्रीत हिमाचल प्रदेश येथील मंडी परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये थांबला होता. प्रवासातील थकवा जावा या कारणाने केवळ एक रात्र मुक्काम करण्यासाठी तो इथे आला होत. तो झोपल्यानंतर शेजारील टेबलवर काढून ठेवलेले रोहनप्रीतचे अॅपलचे घड्याळ (apple watch), आयफोन (iphone) आणि हिऱ्याची अंगठी (diamond ring) चोराने लंपास केली.

यासंदर्भात रोहनप्रीतने पोलिसांकडे चोरीची तक्रार केली होती. रोहनप्रित याची तक्रार नोंहवण्यात आली असून पोलीस हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहेत. सोबत हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात असल्याची माहिती मंडीच्या पोलिस निरीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com