'बाळाला वाचवू की आईला..', अभिनेत्री नेहा मर्दानं सांगितला डिलीव्हरीचा मनाला सुन्न करणारा प्रसंग..Neha Marda | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Neha Marda

Neha Marda: 'बाळाला वाचवू की आईला..', अभिनेत्री नेहा मर्दानं सांगितला डिलीव्हरीचा मनाला सुन्न करणारा प्रसंग..

Neha Marda: 'बालिका वधू' सीरियलमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री नेहा मर्दाला नुकताच कन्या रत्नाचा लाभ झाला आहे. पण बाळाला जन्म देण तिच्या जीवावर बेतलं होतं. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की तिला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं.

त्यानंतर सगळंच इतकं बिघडलं की डॉक्टरांना देखील नेहा मर्दाच्या कुटुंबाला विचारावं लागलं होतं की आईला वाचवायचं की बाळाला. नेहा मर्दानं यासंदर्भात युट्युब ब्लॉगमध्ये सांगितलं आहे.

अभिनेत्रीनं आपल्या डिलीव्हरी दरम्यान आलेल्या अनेक जीवघेण्या प्रसंगाचा उल्लेख त्यात केला आहे.(Neha Marda: when doctor asked neha marda family maa ko bachayein ya bacche ko actress shares pregnancy)

नेहा मर्दानं शेअर केलेल्या व्हिडीओत आपल्या चाहत्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली आहेत आणि आपला प्रेग्नेंसी दरम्यानचा पूर्ण प्रवास शेअर केला आहे. नेहा मर्दा एप्रिल २०२३ मध्ये आई बनली होती.

नेहा मर्दा म्हणाली, ''माझी सी सेक्शन सर्जरी झाली आहे,जी प्लॅन नव्हती.आधी वाटत होतं की माझी नॉर्मल डीलिव्हरी होईल. पण माझं अचानक वाढणारं आणि कमी होणारं ब्लड प्रेशर यामुळे माझं सी सेक्शन करावं लागलं. आणि अशी वेळ आली की डॉक्टरांना माझ्या कुटुंबाला विचारावं लागलं की आईला वाचवायचं की बाळाला. मी त्यावेळी या सगळ्या संकटात टाकणाऱ्या प्रश्नांपासून दूर होते. मला याविषयी काहीच माहित नव्हतं''.

नेहा मर्दा पुढे म्हणाली,''ज्यांचं सी सेक्शन झालं आहे त्यांना उगाच हिणवू नका. तुम्ही स्वतःसाठी खूप छान सोपा मार्ग शोधून काढलात असं त्यांना म्हणू नका. सगळ्यांना असह्य कळा डिलीव्हरी दरम्यान सहन कराव्या लागतात. कोणाला आधी कोणाला नंतर''.

'' महत्त्वाचं हे असतं की आपलं मूल निरोगी आणि सुदृढ असावं. ना सी-सेक्शन सोपं आहे ना नॉर्मल डिलीव्हरी''.

नेहा मर्दाच्या नुसार, तिला ब्लड प्रेशरमुळे डिलीव्हरी दरम्यान जीवघेण्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं.

नेहा मर्दाच्या करिअरविषयी बोलायचं झालं तर ती 'बालिका वधू' व्यतिरिक्त 'देवों के देव महादेव' आणि 'एक हजारों में मेरी बहना है' तसंच 'मीतःबदलेगी दुनिया की रीत' सारख्या शोजचा भाग राहिली आहे.