esakal | नेटक लाईव्ह! ऋषिकेश जोशी यांचा मराठी रंगभूमीवरील आगळा वेगळा प्रयोग...
sakal

बोलून बातमी शोधा

नेटक लाईव्ह! ऋषिकेश जोशी यांचा मराठी रंगभूमीवरील आगळा वेगळा प्रयोग...

मराठी रंगभूमीवरील आणखी एक आगळावेगळा प्रयोग म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात आहे, ते मराठीतील पहिलेवहिले "नेटक लाईव्ह' म्हणजे इंटरनेटवरील लाईव्ह नाटक "मोगरा'चा शुभारंभ 12 जुलै रोजी होत आहे. ही संकल्पना आणि नाटकाचे दिग्दर्शन ऋषिकेश जोशीने यांनी केले आहे. त्या नव्या प्रयोगाबद्दल...

नेटक लाईव्ह! ऋषिकेश जोशी यांचा मराठी रंगभूमीवरील आगळा वेगळा प्रयोग...

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे - सकाळ न्युज नेटवर्क

मराठी रंगभूमीवरील आणखी एक आगळावेगळा प्रयोग म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात आहे, ते मराठीतील पहिलेवहिले "नेटक लाईव्ह' म्हणजे इंटरनेटवरील लाईव्ह नाटक "मोगरा'चा शुभारंभ 12 जुलै रोजी होत आहे. ही संकल्पना आणि नाटकाचे दिग्दर्शन ऋषिकेश जोशीने यांनी केले आहे. त्या नव्या प्रयोगाबद्दल...
----------
नेटक लाईव्ह ही संकल्पना कशी सुचली?
- गेले चार महिने थिएटर आणि चित्रपटगृहे बंद आहेत आणि आणखीन तीन-चार महिने काही होईल असे वाटत नाही. त्यामुळे मी खूप विचार केला. माझ्याकडे एक स्क्रीप्ट आली होती, तेव्हा मी त्याचा काही विचार केला नाही. त्यामध्ये काही बदल करून सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लाईव्ह नाटक करता येऊ शकेल का, असे मनात आले. माझी काही मित्रमंडळी आहेत, ती तंत्रज्ञानामध्ये माहीर आहेत. त्यांच्याशी चर्चा केली. संशोधन केले आणि माझ्या डोक्‍यातील कल्पना प्रत्यक्षात आता येत आहे. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने कसे पाहावे ही गोष्ट या नाटकात आहे.

असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे, त्याबद्दल काय सांगाल?
- सध्या सोशल मीडियावर जे काही दिसते त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही. तुम्हाला जे दिसणार आहे ते प्रॉपर नाटक असणार आहे. आमचे हे नाटक अगदी नाट्यगृहात दाखवितात तसेच दिसणार आहे. पाहणाऱ्या प्रेक्षकांना आपण नाटक पाहात आहोत याचा फील येणार आहे. याद्वारे आम्ही प्रोजेक्‍टद्वारे पन्नासेक लोकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये वेगळे काही तरी करण्याचा आनंद आम्हाला मिळणार आहे. आता प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतोय ते पाहायचे; परंतु एक गोष्ट निश्‍चित की माझ्या टीमने खूप मेहनत घेतली आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून नाटक लाईव्ह दाखविणार आहोत. पाच कलाकार यामध्ये काम करीत आहेत आणि ते आपापल्या घरूनच सहभागी होणार आहेत. "हंगामा सिटी डॉट कॉम'वर जायचे. तेथे "मोगरा'ची जाहिरात दिसेल. त्यावर तुम्हाला तिकीट बुक करावे लागेल आणि त्यानंतर एक लिंक तुम्हाला येईल. तेथे तुम्ही घरबसल्या नाटक पाहू शकता.

या प्रयोगानंतर अन्य कुठे कुठे प्रयोग होणार आहेत?
- जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे तेथे या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. विविध शहरांमध्ये हे नाटक जाणार आहे. त्या त्या शहरातील नाटकांच्या प्रयोगाचे तिकीट त्याच शहरात "हंगामा'वर मिळणार आहेत. दुसऱ्या शहरात नाही मिळणार. भारतात तसेच परदेशातही हे नाटक जाणार आहे. 11 जुलै रोजी अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिको येथे रात्री साडेनऊ वाजता शुभारंभाचा प्रयोग, तर भारतातील शुभारंभाचा प्रयोग मुंबईत दुपारी साडेचार वाजता होणार आहे.

कलाकारांची निवड कशी केली?
- विषय पहिल्यांदा डोक्‍यात होता. त्यानंतर कलाकारांची नावे समोर आली. नव्या माध्यमासाठी काम करण्यास तयार असणारे आणि या माध्यमाची आवड असणारे कलाकार घेतले आहेत. वंदना गुप्ते, स्पृहा जोशी, भार्गवी चिरमुले, मयुरा पालांडे व गौरी देशपांडे हे कलाकार आहेत. तेजस रानडेने ते लिहिले आहे आणि अजित परबने संगीत दिले आहे.

नेटक लाईव्ह या व्यासपीठाचे अभिषेक बच्चनने खूप कौतुक केले आहे असे ऐकले...
- हो... "अत्यंत अद्वितीय, अग्रगण्य आणि विस्मयकारक असा हा प्रयोग माझा मित्र आणि सहकारी ऋषिकेश जोशी करीत आहे. त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा.. मी हा प्रयोग पाहण्यास खूप उत्सुक आहे...' असे ट्‌विट त्याने केले आहे. त्याने आणि मी "ब्रीद इन टू द शॅडोज' या वेबसीरिजमध्ये काम केले आहे.

--------------------------------------------------------------

(संपादन - तुषार सोनवणे)

loading image
go to top