
Madhuri Dixit Fan: धकधक गर्लचा अपमान खपवून घेणार नाय! पठ्यानं Netflixलाच पाठवली नोटीस...
Madhuri Dixit Fan: बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री माधुरी दीक्षित ही देशातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या चाहत्यांची क्रेझ खूप आहे.
माधुरी दीक्षितला बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणतात. तिच्याबद्दल काही बोलेलं तिच्या चाहत्यांना मुळीच आवडतं नाही. त्यामुळे तिचा अपमान केल्यानं नेटफ्लिक्सला नोटिस पाठवण्यात आली आहे.
OTT प्लॅटफॉर्म Netflix ला लेखक आणि राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झालेल्या 'बिग बँग थिअरी' शोचा एक भाग काढून टाकण्यासंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
हे संपूर्ण प्रकरण माधुरी दीक्षितशी संबंधित असल्यानं तो एपिसोड काढून टाकण्यात यावा असं कुमार यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
या सिरिजमध्ये माधुरी दिक्षितचा अपमान करण्यात आला आहे जे खुप अपमानास्पद आणि कलंकास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
बिग बँग थिअरीच्या दुसऱ्या सीझनमध्ये शेल्डन कूपरची भूमिका साकारणाऱ्या जिम पार्सन्सने ऐश्वर्या राय बच्चनची तुलना माधुरी दीक्षितशी केली. ऐश्वर्या राय ही गरिबांची माधुरी दीक्षित असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
याशिवाय राज कूथरापल्लीची भूमिका साकारणाऱ्या कुणाल नय्यरने ऐश्वर्या रायला देवी म्हटले तर माधुरी दीक्षितसाठी आक्षेपार्ह शब्द वापरले.
मिथुन विजय कुमारने जेव्हा हा सीन पाहिला तेव्हा त्याने थेट नेटफ्लिक्सला नोटीस पाठवली.
राज कूथरापल्लीची भूमिका साकारणाऱ्या कुणाल नायरने एपिसोडमध्ये सांगितले की, ऐश्वर्या राय देवीसारखी होती आणि तिच्या तुलनेत माधुरी दीक्षित ही प्रॉस्टिट्यूट वेश्या होती.
हा शो माधुरीचा अनादर करणारा असल्याचं सांगत मिथुन विजय कुमारने नेटफ्लिक्सला याबाबत नोटीस बजावली आहे.
त्यांनी या भागाचे वर्णन लिंगभेद आणि कुरूपतेला प्रोत्साहन देणारे असे केले आहे. या नोटिसाला उत्तर न दिल्यास नेटफिक्सवर कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याच या नोटिसीत म्हटलं आहे.
त्यांनी आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की नेटफ्लिक्स सारख्या कंपन्यांनी त्यांची जबाबदारी नीट समजून घेतली पाहिजे की ते काय दाखवत आहेत. हे व्यासपीठ सामाजिक मूल्ये आणि समाजाच्या भावनांबाबत संवेदनशील असले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.