
भारतात आणि जगभरात 'नेटफ्लिक्स' हा लोकप्रिय अॅप सध्या टॉपला आहे. आता मनोरंजनासाठी आणखी एक अॅप बाजारात उतरले आहे आणि त्याचा जबरदस्त फटका नेटफ्लिक्सला सहन करावा लागत आहे.
मुंबई : टेलिव्हिजन नंतर आता इंटरनेटचं वर्चस्व गेल्या काही वर्षांमध्ये वाढलं आहे. त्यामुळे मनोरंजनाच्या व्याख्येचं स्वरूपही बदलत आहे. वेब सिरीज हा प्रकार आता भारतामध्ये लोकांना चांगलाच माहीत झाला आहे आणि पसंतीतही उतरला आहे. त्यामुळे Over the top (OTT) म्हणजेच नेटफ्लिक्स, हॉटस्टारसारखे ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रिमिंग अॅप्स सध्या अव्वल स्थानावर आहेत. भारतात आणि जगभरात 'नेटफ्लिक्स' हा लोकप्रिय अॅप सध्या टॉपला आहे. आता मनोरंजनासाठी आणखी एक अॅप बाजारात उतरले आहे आणि त्याचा जबरदस्त फटका नेटफ्लिक्सला सहन करावा लागत आहे.
द वॉल्ट डिस्ने कंपनीचं ‘डिस्ने प्लस’ नावाचं अॅप बाजारात आलं आहे. हे अॅप नुकतचं आलं असून त्याचा जबरदस्त फटका नेटफ्लिक्सला बसला आहे. महिन्याभरातच नेटफ्लिक्सचे तब्बल 1 कोटी 10 लाख प्रेक्षक गमावले आहेत. एका महिन्यातच डिस्ने प्लसने इतचे सबस्क्राइबर्स खेचून घेतले आहेत. अनेक प्रेक्षकांनी नेटफ्लिक्स बंद करुन आता ते डिस्ने प्लसकडे वळले आहेत. ही बाब नेटफ्लिक्ससाठी मोठी आहे. न्यू यॉर्क टाइम्सने यावर सर्वेक्षण केले आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिस्नेकडे पहिल्याच दिवशी दहा मिलियन सबस्क्राइबर्स वळले. आणि सध्या त्यांचे 15 कोटी सबस्क्राइबर्स झाले आहेत.
एकचट्या युएस (USA) मध्ये डिस्ने प्लसमुळे 5.8% नेटफ्लिक्स युजरर्संनी त्यांचे सबस्क्राइबर्स रद्द केले आहे. डिस्ने ही जगातील सर्वात मोठी मनोरंजन आणि चित्रपट निर्मिती करणारी कंपनी आहे. याआधी नेटफ्लिक्सवर डिस्नेचे चित्रपट आणि सिरिज रिजि होत असे. पण डिस्ने कंपनीने आता स्वतंत्रपणे स्ट्रिमिंग अॅप काढल्याने त्यांचे सर्व चित्रपट नव्या अॅपवरच दाखविले जातात. भविष्यात जवळपास 60 कोटी प्रेक्षक नेकफ्लिक्सपासून दुरावण्याची शक्यकता वर्तवली जात आहे. नेकफ्लिक्सच्या मार्केटला यामुळे जबरदस्त फटका बसला आहे.