बाहुबलीचा येणार 'प्रिक्वेल'

शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नेटफ्लिक्सने याची अधिकृत घोषणा गुरूवारी (ता.02) केली आहे. 'बाहुबली बिफोर द बिगनिंग' या नावाखाली ही सिरीज चालणार आहे. आनंद निलकंठन यांच्या 'द राइज ऑफ शिवगामी' या कांदबरीवर आधारित ही सिरिज असणार आहे. कधी मृदू तर वेळ प्रसंगी काळजाचा दगड करून शासन करणाऱ्या या राजमातेचा सामान्य मुलगी ते सम्राज्ञी असा प्रवास या प्रिक्वलमधून पाहायला मिळणार आहे. एक बंडखोर मुलगी ते साम्राज्याची राजमाता असे शिवगामीचे अनेक पैलू यामध्ये उलगडले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई - बाहुबली आणि बाहुबली 2 च्या यशानंतर आता लवकरच बाहुबलीचा प्रिक्वेल येणार आहे. माहिश्मती साम्राज्याच्या राजमाता शिवगामी यांच्यावर आधारित हा प्रिक्वेल असणार आहे. हा प्रिक्वेल नेटफ्लिक्स सिरिज प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणणार आहे. बाहुबली आणि बाहुबली 2 या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आता या चित्रपटाचा प्रिक्वेल वेबसरिजच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याची प्रंचड उत्सुकता आहे.

नेटफ्लिक्सने याची अधिकृत घोषणा गुरूवारी (ता.02) केली आहे. 'बाहुबली बिफोर द बिगनिंग' या नावाखाली ही सिरीज चालणार आहे. आनंद निलकंठन यांच्या 'द राइज ऑफ शिवगामी' या कांदबरीवर आधारित ही सिरिज असणार आहे. कधी मृदू तर वेळ प्रसंगी काळजाचा दगड करून शासन करणाऱ्या या राजमातेचा सामान्य मुलगी ते सम्राज्ञी असा प्रवास या प्रिक्वलमधून पाहायला मिळणार आहे. एक बंडखोर मुलगी ते साम्राज्याची राजमाता असे शिवगामीचे अनेक पैलू यामध्ये उलगडले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

एकूण 9 भागांची ही सिरिज असणार आहे. नेटफ्लिक्सने यासाठी बाहुबलीची निर्मिती करणाऱ्या आर्का मीडिया वर्क्स आणि राजामौली यांच्यासोबत एक टीम बनवली आहे. देवा कट्टा आणि प्रवीण सतारु या सिरीजचे सहदिग्दर्शक असतील. प्रिक्वेल कडून राजमौली यांनी खुप आशा आहेत.

Web Title: Netflix reveals plans for a Baahubali prequel series