'बिग बॉस मराठी'शिवाय नेटकऱ्यांना करमेना; महेश मांजरेकरांना केली विनंती | Bigg Boss Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 3 Grand Finale

'बिग बॉस मराठी'शिवाय नेटकऱ्यांना करमेना; महेश मांजरेकरांना केली विनंती

काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. २६ डिसेंबर २०२१ रोजी या लोकप्रिय शोचा ग्रँड फिनाले पार पडला. या शोने जवळपास १०० दिवस प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. त्यामुळे आता शो संपल्यानंतर प्रेक्षकांना करमेनासं झालं आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी याबाबत कमेंट्स केल्या आहेत. इतकंच नव्हे तर या शोचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याकडे नेटकऱ्यांनी विनंती केली आहे. (Bigg Boss Marathi)

दररोज रात्री बिग बॉस मराठीचा एपिसोड पाहणं म्हणजे एक सवयच झाली होती आणि आता शो संपल्यामुळे वेळ घालवणं कठीण होत असल्याचं एका युजरने लिहिलं. 'आज विचार केला, चला बिग बॉसचा एपिसोड बघुयात, मात्र नंतर लक्षात आलं की अरे हा शो तर संपला आहे. आता पुढच्या सिझनची फार उत्सुकत आहे', असं दुसऱ्याने म्हटलं. आणखी एका नेटकऱ्याने सर्व स्पर्धकांचे फोटो पोस्ट करत नवीन सिझन लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती केली.

हेही वाचा: 'तो खूप कठीण काळ होता'; दीपिकाने सांगितला कोरोनाशी सामना करण्याचा अनुभव

काही युजर्सनी महेश मांजरेकरांना टॅग करत ते सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक असल्याचं कौतुक केलं. प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब म्हणजे चौथा सिझन नवीन वर्षात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉस मराठी ४ हा एप्रिल २०२२ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. या चौथ्या सिझनमध्ये प्रेक्षकांसाठी भरपूर सरप्राईज असतील. शिवाय यामध्ये कोणते कलाकार सहभागी होणार, याबद्दलची तयारीसुद्धा सुरू झाली आहे.

बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन हा जवळपास दोन वर्षांनंतर लाँच झाला होता. या सिझनला पहिल्या दोन सिझनपेक्षा खूप जास्त प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादाचा विचार करूनच आता चौथा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा विचार निर्मात्यांनी केला आहे. कोविड आणि लॉकडाउनमुळे प्रेक्षकांना तिसऱ्या सिझनसाठी खूप प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र चौथ्या सिझनसाठी त्यांना फार थांबावं लागणार नाही, असं निर्माते ग्रँड फिनालेमध्ये म्हणाले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top