esakal | 'तुझ्या इश्काचा नादखुळा' मालिकेत 'ही' अभिनेत्री आणणार नवं वादळ
sakal

बोलून बातमी शोधा

Tuzya Ishqacha Naadkhula

'तुझ्या इश्काचा नादखुळा' मालिकेत 'ही' अभिनेत्री आणणार नवं वादळ

sakal_logo
By
स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'तुझ्या इश्काचा नादखुळा' Tuzya Ishqacha Naadkhula मालिकेत धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रघु आणि स्वातीच्या आयुष्यात माया नावाचं वादळ येणार आहे. खरंतर रघु आणि स्वातीचं नातं आता कुठे खुलायला लागलं होतं. मात्र माया या पात्रामुळे 'तुझ्या इश्काचा नादखुळा' ही मालिका अतिशय नाट्यमय वळणावर येऊन पोहोचली आहे. यामध्ये अभिनेत्री प्रतीक्षा जाधव Pratiksha Jadhav ही मायाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. प्रतीक्षाला याआधी बऱ्याच मालिकांमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं आहे. स्टार प्रवाहच्या छोटी मालकीण आणि मोलकरीण बाई या मालिकेत तिने लक्षवेधी भूमिका साकारली आहे. (new character entry in marathi serial Tuzya Ishqacha Naadkhula)

खरंतर माया तिच्या नावा सारखीच मायावी आहे. स्वतःचा खरा चेहरा समोरच्याला कधीही कळू न देण्यात सराईत. कुलकर्णी कुटुंबात येण्यामागे मायाचं नेमकं कोणतं षडयंत्र आहे? मायाच्या एण्ट्रीने रघू आणि स्वातीच्या आयुष्यात नेमकी काय उलथापालथ होणार आहे हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. तुझ्या इश्काचा नादखुळा ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा: मनोज वाजपेयीची ऑनस्क्रीन मुलगी; जाहिराती, मालिकांमध्येही केलंय काम

हेही वाचा: मराठी मालिका गाजवणाऱ्या 'या' अभिनेत्रीला आता ओळखणंही कठीण

मालिकेतील संचित चौधरीचा थक्क करणारा प्रवास

या मालिकेत रघू ही भूमिका साकारणाऱ्या संचित चौधरीचा अभिनयाचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. संचित मुळचा नागपूरचा. वडील शिक्षक असल्यामुळे संचितनेही शिक्षक व्हावं अशी त्यांची इच्छा होती. संचितने सायकॉलॉजीमध्ये एम.ए केलं आणि दोन वर्ष प्रोफेसर म्हणून सरकारी शाळेत नोकरीही केली. संचितला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. टीव्हीवरचे कॉमेडी शोज पाहून तो स्क्रीप्ट लिहायचा आणि शाळेत परफॉर्म करायचा. दहावीनंतर मात्र त्याला काही स्पर्धांविषयी कळलं. मग त्याने नागपूरातला रंगरसिया थिएटर ग्रुप जॉईन केला. त्यानंतर राज्यनाट्य, पुरुषोत्तम करंडक, प्रबोधन करंडक, सवाई, लोकांकिका या नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेत घेत तो मुंबईत पोहोचला. मुंबईत पृथ्वी थिएटरमध्ये त्याने बरीच नाटकं सादर केली. हिंदी आणि मराठीसाठी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही त्याने काम केलं. नोकरी करता करता हे सर्व चालू होतं.

अभिनय क्षेत्राची आवड असलेल्या संचितला नोकरीत काहीच रस नव्हता. खिसे भरत होते मात्र मन भरत नव्हतं. त्यामुळे सरकारी नोकरी सोडून त्याने पूर्णपणे अभिनय करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला घरातून विरोध झाला, मात्र त्याच्या हट्टापायी वडिलांनीही साथ दिली. 'प्रेमाचा गेम सेम टू सेम' मालिकेत दुहेरी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर आता संचित तुझ्या इश्काचा नादखुळा या मालिकेत रघूच्या भूमिकेत दिसत आहे.