नव्या नाटकातले हे कलाकार आहेत तरी कोण?

शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मराठीत खूप नवेनवे प्रयत्न होतात. सिनेमाबाबत बोलायचं तर नवे विषय येतात आणि अनेक कलाकार वेशभूषेतून किंवा रंगभूषेतून स्वत: वर नवे प्रयोग करताना दिसतात. पण सिनेमासोबत नाटकातही हे प्रयोग आता जोर धरू लागलेत. कारण मराठी रंगभूमीवर एक नवं नाटक येत आहे, त्यातले हे दोन कलाकार आहेत. खरंतर अप्रतिम रंगभूषेने त्यांचे मूळ रूप कुठेच दिसत नाही. पण मराठी रंगभूमीवरचे दोन दिग्गज कलाकार या नाटकाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहेत.  नीट पहा आणि बघा ओळखता येते का हे कलाकार कोण आहेत ते.

पुणे : मराठीत खूप नवेनवे प्रयत्न होतात. सिनेमाबाबत बोलायचं तर नवे विषय येतात आणि अनेक कलाकार वेशभूषेतून किंवा रंगभूषेतून स्वत: वर नवे प्रयोग करताना दिसतात. पण सिनेमासोबत नाटकातही हे प्रयोग आता जोर धरू लागलेत. कारण मराठी रंगभूमीवर एक नवं नाटक येत आहे, त्यातले हे दोन कलाकार आहेत. खरंतर अप्रतिम रंगभूषेने त्यांचे मूळ रूप कुठेच दिसत नाही. पण मराठी रंगभूमीवरचे दोन दिग्गज कलाकार या नाटकाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहेत.  नीट पहा आणि बघा ओळखता येते का हे कलाकार कोण आहेत ते.

शेखर ताम्हाणे आणि राजन ताम्हाणे यांची संस्था हे नाटक आणते आहे. मूळ गुजराती नाटक असलं तरी आता याचं मराठीकरण झालं आहे. विशेष बाब अशी की या नाटकातून शिवानी रांगोळे ही मुलगी व्यावसायिक रंगमंचावर पाऊल ठेवते आहे. या नाटकाचं नाव आहे वेलकम जिंदगी. या नाटकाचं पोस्टर नुकतंच रिविल करण्यात आलं. या पोस्टरमधूनच हे नाटक काहीतरी वेगळं असणार आहे याची खात्री पटते. रंगभूषेमुळे या कलाकारांची वयं वाढवल्यामुळे त्या नाटकाचा जिवंत अनुभव घेणं ही पर्वणी असणार आहे. 

आत्तापर्यंत तुम्ही ओळखलं असेलच की हे कलाकार कोण ते, पण नाहीच ओळखता आलं तर तुम्हाला आता सांगायला हरकत नाही. हे आहेत डाॅ. गिरीश ओक आणि भरत जाधव. हे दोन कलाकार या नाटकाच्या निमित्ताने एकत्र येताहेत.  

Web Title: new drama new artista welcome zindagi esakal news