हंसराज जगतापची नवी आयटमगिरी लवकरच पडद्यावर

टीम ई सकाळ
गुरुवार, 8 जून 2017

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता हंसराज जगताप व फँन्डी फेम राजेश्वरी खरात यांची ‘अॅटमगिरी’ लवकरच रुपेरी पडद्यावर आपणाला पाहायला मिळणार आहे.

मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता हंसराज जगताप व फँन्डी फेम राजेश्वरी खरात यांची ‘अॅटमगिरी’ लवकरच रुपेरी पडद्यावर आपणाला पाहायला मिळणार आहे. सुरवातीपासूनच बहुचर्चित असलेल्या अॅटमगिरी या चित्रपटाच्या ट्रेलर नुकतच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत धनश्री मेश्राम, माननी दुर्गे, सुरज टक्के, शशी ठोसर, छाया कदम, अमित तावरे व मिलिंद शिंदे हे कलाकार आहेत.
                      
 किशोरवयीन वयातील प्रेमाचा ठाव या चित्रपटात घेतला असून एक वेगळी प्रेम कहाणी या चित्रपटातून रसिकांना अनुभवता येणार आहे.  या चित्रपटातील गीतांना रोहित नागभिडे यांनी संगीत दिले असून आर्या आंबेकर  व आदर्श शिंदे यांचा स्वर लाभला आहे. 

Web Title: New film esakal news