कर्ण होणार कोण? सर्वात मोठा प्रश्न, तीन जणांची नावं चर्चेत

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 23 February 2021

या चित्रपटात पूर्ण कथा ही कर्णाच्या दृष्टिकोनातून मांडण्यात आली आहे.  

मुंबई - महाभारतील प्रत्येक व्यक्तिरेखा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील तत्वज्ञान सांगून जाते. कुणाला अर्जुन जवळचा वाटतो, तर कुणाला भीम, अनेकांची पसंती कृष्णालाही असते. मात्र यासगळ्यात जाणकारांचे लक्ष वेधून घेतो तो कर्ण. त्याबद्दल आजवर अनेकांनी लिहिले आहे. कर्णावर आता बॉलीवूडमध्ये चित्रपट येतो आहे. मात्र त्यात प्रमुख भूमिका असलेला कर्ण साकारणार कोण असा प्रश्न आता दिग्दर्शक आणि निर्मात्यांना पडला आहे.

पूजा एंटरटेनमेंटच्या वतीनं कर्णावर आधारित एक चित्रपट तयार करण्यात येणार आहे. ज्याचे नाव सुर्यपुत्र महावीर कर्ण असे आहे. त्याची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. डॉ.कुमार विश्वास हे यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. या चित्रपटाचे लेखक म्हणूनही ते या सर्व निर्मिती प्रक्रियेशी जोडले गेले आहेत. महाभारताची जेव्हा गोष्ट समोर येते तेव्हा कर्णाचे नाव घेतले जाते. साहित्यातून कर्णावर अनेकांनी भाष्य केलं आहे. मात्र चित्रपटाच्या माध्यमातून फार कमी जणांनी त्याची दखल घेतली आहे. आता कर्णाच्या जीवनावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती करुन कर्णाच्या आयुष्यातील काही खास बाबी उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या चित्रपटात पूर्ण कथा ही कर्णाच्या दृष्टिकोनातून मांडण्यात आली आहे. मंगळवारी निर्मात्यांच्या वतीनं सोशल मीडियावर त्याचा लोगो प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आरएस विमल करणार आहे. तर जॅकी भगनानी, वासु भगनानी आणि दीपशिखा देशमुख हे निर्माते आहेत. हा चित्रपट पॅन इंडिया प्रदर्शित करणार आहे. तसेच हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. 

सारानं घायाळ केलयं, नव्या फोटोशूटवरून नजर हटणार नाही 

चूकुनही पाहू नये, असं 'हॅशटॅग प्रेम’मधलं गाणं व्हायरल

कर्ण चित्रपटाचा लोगो कमालीचा आकर्षक आहे. त्यात व्हिएफएक्स आणि स्पेशल इफेक्टसचा वापर करण्यात आला आहे. त्यातील युध्दविषयक प्रसंग कमालीचे प्रभावशाली आहेत. मात्र अजून त्यात कोणते अभिनेते अभिनय करणार याविषय़ी कुठलीही माहिती समोर आलेली नाही. डॉ.विश्वास यांनी आपल्या व्टिटमध्ये लिहिले आहे की. एका हरवलेल्या योध्द्यावर चित्रपट तयार होत आहे. याचा आनंद आहे. मी विचार करतो की, त्याची भूमिका कोण करु शकेल, त्यात माझ्या समोर रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि विकी कौशल यांची नावे आहेत. 
 

 
  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new film surya putra mahavir karna announced based on mahabharat baahubali character by pooja entertainment