मराठी चित्रपटसृष्टीत हालचालींना वेग, सोशल मीडियावर पोस्टर्स लाँच व चित्रपटांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सोशल मीडियावर टीझर, पोस्टर्स तसेच ट्रेलर लाँच करणे सुरू झाले आहे. हळूहळू मराठी चित्रपटसृष्टीतील हालचालींना सुरुवात झाली आहे असेच म्हणावे लागेल.

मुंबई : सध्या लाॅकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. काही ठिकाणी नियमामध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. चित्रपटसृष्टी तसेच नाट्यसृष्टी अजूनही ठप्प झाली आहे. सरकार कधी परवानगी देईल हे काही सांगता येत नाही. मात्र मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सोशल मीडियावर टीझर, पोस्टर्स तसेच ट्रेलर लाँच करणे सुरू झाले आहे. हळूहळू मराठी चित्रपटसृष्टीतील हालचालींना सुरुवात झाली आहे असेच म्हणावे लागेल.

हे ही वाचा - बोनी कपूरच्या घरातील आणखीन दोन नोकर पॉझिटिव्ह

मराठीमध्ये वेल डन बेबी या चित्रपटाचे पोस्ट प्राॅडक्शनचे काम देखील पूर्ण झालेले आहे. तसेच  "लॉ ऑफ लव्ह" या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. जे. उदय या चित्रपटाचे निर्माते आहेत. ते म्हणाले, की "प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, सध्याची परिस्थिती पूर्णपणे जाणता खास सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या लोकांसाठी नवं काही तरी देण्याचा एक प्रयत्न म्हणून आम्ही फर्स्ट लूक पोस्टरचं अनावरण केलं आहे.

Kavach': Ghanshyam Vishnupant Yede unveils the title poster of his ...

लॉकडाऊनच्या काळात उत्सुकता वाढविणे आणि सर्व काही सुरळीत चालू झाल्यावर प्रेक्षकांना काही तरी वेगळे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्याची परिस्थिती लवकरच निवळेल अशी आम्हाला आशा आहे. सोशल मीडियावर आम्ही आमच्या चित्रपटाचे पहिले पोस्टर्स लाँच केले आणि त्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद आतापर्यंत दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ऑन ड्युटी २४ तास अहोरात्र सुरक्षेसाठी झटणारे पोलिस आज देशावर ओढवलेल्या सामाजिक आपत्तीतही सर्वांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

Pushkar Jog and Amruta Khanvilkar starrer 'Well Done Baby' gets a ...

पोलिसांच हे कवच आपल्याभोवती असल्याने आपण आज सुरक्षित आहोत. याची जाणीव करुन देणारा 'मातृपितृ फिल्म्स' कंपनी निर्मित कवच हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक घनशाम विष्णूपंत येडे या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन करणार आहेत. नुकतीच त्यांनी या संबंधीची घोषणा केली आहे.

कोरोनाच्या विरोधात सुरु असलेल्या लढाईतही पोलिसांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याला सलाम करत कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजातील कवच चित्रपटातील शीषर्क गीत लवकरच 'मातृपितृ फिल्म्स'च्या युटयूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे संगीत सूरज यांचे असून चित्रपटाचे छायांकन सरफराज खान करणार आहेत.  

new marathi movies poster launch on social media during lockdown


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new marathi movies poster launch on social media during lockdown