esakal | 'कुसुम' मालिका आता मराठीत; 'शितली' साकारणार भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

'कुसुम' मालिका आता मराठीत; लाडकी 'शितली' साकारणार भूमिका

'कुसुम' मालिका आता मराठीत; लाडकी 'शितली' साकारणार भूमिका

sakal_logo
By
स्वाती वेमूल

सोनी मराठी वाहिनीवर 'कुसुम' Kusum ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर Shivani Baokar या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'शीतली' या व्यक्तिरेखेमुळे शिवानी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली. सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे. बालाजी टेलिफिल्म्स आणि सोनी मराठी मिळून ही नवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.

आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि सासर-माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पेलणारी ही कुसुम आहे. सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज, असा सगळ्या मुलींच्या मनातला प्रश्न या मालिकेतून मांडण्यात येणार आहे. आत्तापर्यंत या मालिकेचे तीन प्रोमो प्रदर्शित झाले आहेत. माहेरचं लाईट बील भरणारी, वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जाणारी आणि सगळ्यांची उत्तम काळजी घेणारी कुसुम या प्रोमोमधून प्रेक्षकांना दिसली. २००१ साली हिंदीमध्ये 'कुसुम' नावाची मालिका प्रसारित झाली होती. त्या मालिकेचं हे मराठी रुपांतर आहे. तेव्हाही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि रेकॉर्ड ब्रेकर ठरली होती.

हेही वाचा: टीव्ही अभिनेत्रीने संपवलं जीवन; आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहिलं कारण

'कुसुम' ही मालिका ४ ऑक्टोबरपासून संध्याकाळी ८:३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेविषयी एकता कपूर म्हणाली, "२१ वर्षांनंतर 'कुसुम' प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येत आहे. मी खूप आनंदी आहे. ही मालिका माझ्या खूप जवळची आहे. मी मराठीमध्ये याआधीही काम केले आहे, पण खूप काळानंतर मी मराठीमध्ये पुन्हा येत आहे."

loading image
go to top