'बघीराचा' धूर; प्रभुदेवाचा 'सणकी' अवतार व्हायरल 

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 19 February 2021

वास्तविक गेल्या काही दिवसांपासून प्रभुदेवा हा त्याच्या बघिरा चित्रपटासाठी चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

मुंबई -  आतापर्यत प्रभुदेवा हा डान्स आणि दिग्दर्शनासाठी माहिती होता. आता त्याच्या एका नव्या मुव्हीचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावरील हा ट्रेलर प्रचंड लोकप्रिय झाला आहे. काही तासांत 5 लाख व्ह्युज मिळाले आहेत. प्रभुदेवाचा बघीरा  नावाचा चित्रपट येतो आहे. त्यात त्याचा लूकच एवढा खास आहे की चाहत्यांनी  पोस्टवर लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पाडला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नव्या चित्रपटाची चर्चा होती.

तमिळ सायको थ्रिलर असा हा चित्रपट आहे. त्यातील प्रभुदेवाचे वेगवेगळे लुक्स एकदम जबरदस्त आहेत. त्याचा हा नवा अवतार चाहत्यांना कमालीचा आवडला आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून प्रभुदेवा हा त्याच्या बघिरा चित्रपटासाठी चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. हा चित्रपट सायको थ्रिलर चित्रपट आहे. त्यात प्रभुदेवानं साकारलेली सणकी व्यक्तीची भूमिका कमालीची लोकप्रिय झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अव्दिक रविचंद्रन यांनी केले आहे.

baghira movie साठी इमेज परिणाम

प्रभुदेवा हा त्याच्या नव्या चित्रपटात वेगवेगळ्या लूक्स मध्ये दिसून आला आहे. यात गंमतीची गोष्ट म्हणजे त्याचे हे लुक्स इतके वेगळे आहेत की, तो अनेकदा ओळखुही येत नाही. तो या चित्रपटात एक निगेटिव्ह व्यक्तीची भूमिका साकारत आहे. अशा प्रकारची भूमिका तो पहिल्यांदाच साकारत आहे. किलर लूकमध्ये त्यानं दिलेली पोझ उरात धडकी भरवणारी आहे.

हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याविषयी अजून कुठलीही माहिती समोर आलेली नाही. साऊथचा सुपरस्टार धनुषनंही प्रभुदेवाच्या या टीझरवर एक कॅप्शन दिली आहे. त्यानं लिहिलं आहे की, बघीराचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मला माझ्या मित्रांचे कौतूक करावेसे वाटते. 

दोन दिवसांत अडीच कोटी व्ह्युज; इमरान हाश्मी बॅक, 'लुट गए' रिलीज          

क्या बात है मेनन साब, दादासाहेब फाळके पुरस्कार आपके नाम                                                                                                                 या चित्रपटाशिवाय प्रभुदेवा सलमान खानला घेऊन दबंग 3 ची तयारी करत आहे. तो या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. प्रभुदेवाचे म्हणणे आहे की, त्याच्या आगामी चित्रपटात त्यानं सलमानलाही एका वेगळ्याच लूकमध्ये सादर केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new movie bagheera teaser prabhu devas psycho look shocked audience