टायगर श्रॉफचा नवा म्युझिक व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

या म्युझिक व्हिडिओमध्ये तरूण तसेच मध्यमवयीन लोक एका तालावर नाचताना दिसतील.

नृत्य हे आपल्या पायांनी स्वप्न पाहण्यासारखे आहे. बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ नृत्य करायला लागतो, तेव्हा हेच सिद्ध करतो. तरूण डान्सिंग सेन्सेशन असलेला टायगर श्रॉफ चित्रपट, स्टंट्स, फिटनेस किंवा नृत्य अशा प्रत्येक गोष्टीचे आव्हान घेतो. त्याने आपला #Areucoming हा म्युझिक व्हिडिओ शुक्रवारी प्रदर्शित केला.

या म्युझिक व्हिडिओमध्ये तरूण तसेच मध्यमवयीन लोक एका तालावर नाचताना दिसतील. हॅप्पी प्रॉडक्शन्स इंडियाची निर्मिती असलेल्या या म्युझिक व्हिडिओची कोरिओग्राफी चित्रपट दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझाने केली असून त्यातील गाणी बॉलिवूड गायक बेनी दयालने गायली आहेत. या व्हिडिओची संगीतरचना सचिन-जिगर यांनी केली आहे.

tiger

या निमित्ताने बोलताना टायगर म्हणाला की, 'मी 8 पीएमच्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवतो, जिथे तुम्ही दिवसभर धावपळ झाल्यावर पार्टी करता, मजा करता आणि तुमच्या मित्रांसोबत धमाल करता. या म्युझिक व्हिडिओमध्ये मी हेच सांगितले आहे.' म्युझिक व्हिडिओमध्यें आंतरराष्ट्रीय मॉडेल लॅरिसाय बोनेसी आणि टायगर श्रॉफ यांच्यामधील रोमॅंटिक केमिस्ट्री दिसेल.

tiger


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New music video of Tiger Shroff