esakal | 'म मनाचा, म मराठीचा'; खास मराठीसाठी येतोय नवा ओटीटी प्लॅटफॉर्म... 
sakal

बोलून बातमी शोधा

marathi ott

मराठी प्रेक्षकांना आपल्या भाषेतील चित्रपट, नाटक, वेबसीरीज लघुपट एका क्लिकवर येथे उपलब्ध होणार आहेत. केवळ मनोरंजन नाही तर पाककला, व्यायाम, लहान मुलाचे माहितीपर कार्यक्रम असे सर्व काही या ओटीटीवर उपलब्ध असेल.

'म मनाचा, म मराठीचा'; खास मराठीसाठी येतोय नवा ओटीटी प्लॅटफॉर्म... 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे. एकापाठोपाठ एक हिंदी चित्रपट ओटीटीवर जात आहेत. परंतु तेथे मराठी चित्रपटांना म्हणावी तशी किंमत मिळत नाही किंबहुना मराठी चित्रपटांना तेथे डावलले जात आहे. त्यामुळे आता प्लॅनेट मराठीने खास मराठीतील ओटीटी प्लॅटफॉर्म आणण्याचा निर्णय घेतला आहे. 'म मनाचा, म मराठीचा' ही टॅगलाईन घेऊन मराठी कलेला प्राधान्य देण्याचा उद्देश या ओटीटी प्लॅटफॉर्मचा आहे. भारतातील हा पहिलावहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म असणार आहे. 

 मालगाडी ठरली मसीहा; लॉकडाऊनमध्येही रेल्वेने अनेक रुग्णांपर्यंत पोहोचविले औषध...  

मराठी प्रेक्षकांना आपल्या भाषेतील चित्रपट, नाटक, वेबसीरीज लघुपट एका क्लिकवर येथे उपलब्ध होणार आहेत. केवळ मनोरंजन नाही तर पाककला, व्यायाम, लहान मुलाचे माहितीपर कार्यक्रम असे सर्व काही या ओटीटीवर उपलब्ध असेल. निर्माते अक्षय बर्दापूरकर, अभिनेता पुष्कर श्रोत्री व संगीत संयोजक आदित्य ओक यांच्या संकल्पनेतून ही कल्पना आकाराला आली आहे. विनायक दाबके, अमोद ओक हेही टीममध्ये आहेत.

बॉलीवूडवर शोककळा; चित्रपट निर्माते हरीश शहा यांचे निधन...

निर्माते अक्षय बर्दापूरकर म्हणाले, "मराठी चित्रपट वितरणाच्या बाबतीत काही प्रमाणात मागे पडत असल्यामुळे आपल्या चित्रपटांच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवरील गणितही मागे पडतात असं चित्र आहे. त्यामुळे वितरणाच्या वेळी खर्च होणारा पैसा हा चित्रपटासाठी वापरला जाऊ शकतो. ओटीटीच्या माध्यमातून हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचवला जाऊ शकतो. शिवाय, यातून रोजगाराच्या संधी आणि नव्या टॅलेंटलाही वाव मिळेल आणि मराठीपण जपत हे माध्यम कायम प्रेक्षकांसाठी आणि मराठी कलाकारांसाठी काम करत राहील". 

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी जम्बो सुविधा; तब्बल 'इतक्या' खाटांचे मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण...

अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणतात, ''प्लॅनेट मराठी हे बदलत्या काळबरोबर बदलत्या मराठी मनोरंजनाची नवी परिभाषा लिहीत आहे''. पुष्कर सेलर प्लॅनेट मराठी सर्व्हिसेस प्रा. लि.चे सीईओदेखील आहेत. संगीत संयोजक आदित्य ओक  म्हणाले, "प्लॅनेट मराठी ओटीटी हे पहिला-वहिला संपूर्णतः मराठीपण जपणारं माध्यम आहे. प्रेक्षकांनाही आमचा हा प्रयत्न नक्की आवडेल अशी मला खात्री वाटते".

loading image
go to top