जाऊबाईनंतर आता 'जा़डूबाई' येणार

टीम इ सकाळ
रविवार, 2 जुलै 2017

निर्मिती सावंत या अभिनत्रीने मुख्य भूमिका साकारलेले जाऊबाई जोरात हे नाटक तुफान गाजले. त्यानंतर छोट्या पडद्यावर त्यांची जोडी जमली ती पंढरीनाथ कांबळेशी. गंगूबाईनेही एक काळ गाजवला. या दोघांनी मालिकाही केली शिवाय नाटकही केले. आता मात्र निर्मिती यांची जोडी जमणार आहे ती किशोरी शहाणे-वीज यांच्याशी. कारण या दोघी एकाच मालिकेत दिसणार आहेत. या माालिकेचे नाव आहे जाडूबाई जोरात. 

मुंबई : निर्मिती सावंत या अभिनत्रीने मुख्य भूमिका साकारलेले जाऊबाई जोरात हे नाटक तुफान गाजले. त्यानंतर छोट्या पडद्यावर त्यांची जोडी जमली ती पंढरीनाथ कांबळेशी. गंगूबाईनेही एक काळ गाजवला. या दोघांनी मालिकाही केली शिवाय नाटकही केले. आता मात्र निर्मिती यांची जोडी जमणार आहे ती किशोरी शहाणे-वीज यांच्याशी. कारण या दोघी एकाच मालिकेत दिसणार आहेत. या माालिकेचे नाव आहे जाडूबाई जोरात. 

या मालिकेचा टीजर रविवारी आऊट झाला. यात निर्मिती आणि किशोरी दिसतात. एका पार्कमध्ये बसलेल्या निर्मिती सावंत आपल्या लठ्ठपणाला कंटाळल्या आहेत. बारीक होण्यासाठी कष्ट घ्यायची त्यांची तयारी आहे. इतक्यात स्लीम अॅंड ट्रीम असलेल्या किशोरी त्याच्याजवळ येतात. त्या अाल्यामुळे निर्मिती यांना आपल्या जाडीचा जास्तच काॅम्प्लेक्स येतो. अशातच भूक लागल्यामुळे त्या थेट वडापाववर ताव मारायला सुरुवात करतात. बारीक व्हायचंय पण उद्यापासून असं म्हणत हा ताव मारला जातो. 

या एकूण संवादांवरून ही मालिका विनोदी असणार हे उघड आहे. ती नेमकी कघी सुरु होणार आणि कोणती मालिका आपला निरोप घेणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

Web Title: new serial jadubai esakal news

टॅग्स