
एकतानं सांगितले की, मी विचार करुन आता एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आपण कुणाच्या दबावाला बळी पडायचं नाही.
मुंबई - प्रख्यात निर्माती एकता कपूर हिची वेगळी ओळख म्हणजे ती छोट्या पडद्यावरची क्वीन आहे. तिचा मोठा प्रभाव हिंदी मालिकांच्या निर्मितीवर आहे. एकता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. आज आपण वेगवेगळ्या वाहिन्यांवर ज्या हिंदी मालिका पाहतो त्यातील अनेक मालिकांची निर्मिती एकतानं केली आहे. गेल्या काही वर्षांपासून ती चित्रपट आणि वेबसीरिज निर्मितीतही उतरली आहे.
सध्या एकता कपूरच्या द मॅरिड वुमन ची जोरदार चर्चा सुरु आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी ही मालिका प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात एकता कपूरनं आपल्या आलेल्या अनुभवांविषयी सांगितले. मॅरिड वूमनच्या पूर्वी एकतानं डॉली किट्टी और वो चमकते सितारे, लिपस्टिक अंडर माय बुरखा, द डर्टी पिक्चर सारखे चित्रपट केले. त्यांना प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. आता नव्यानं प्रदर्शित होणारी मॅरिड वुमन ही मालिका त्याच नावाच्या पुस्तकार आधारित आहे. जिच्या लेखिका मंजू कपूर आहे.
आपल्या नव्या मालिकेच्या प्रदर्शनाच्या औचित्यानं एका कार्यक्रमात काही विचार मांडले. त्यावेळी ती म्हणाली, या मालिकेत महिलांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना स्थान देण्यात आले आहे. त्यातून एक वेगळा विचार मांडण्यात आला आहे. जे मुद्दे सर्वसाधारणपणे दुलर्क्षित केले जातात त्यांना मालिकेच्या माध्यमातून समोर आणले आहे. आतापर्यत सासू-सुन यांच्यातील भांडणांना मालिकेतून मांडणा-या एकतानं हा वेगळा विषय हाताळला आहे.
एकतानं सांगितले की, मी विचार करुन आता एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आपण कुणाच्या दबावाला बळी पडायचं नाही. महिलांच्या लैंगिकतेला अनेक देशांमध्ये चूकीचे समजले जाते. हा एक मोठा प्रश्न आहे. माझ्यावर नेहमी एक आरोप केला गेला की, मी नेहमीच महिलांना साडी, कुंकू यांच्यात दाखवले. त्यामुळे महिलांचा विकास थांबला आहे. मी याच्याशी सहमत नाही. मला वाटतं की, स्विमसुट मध्ये असणं किंवा साडीमध्ये त्या महिलेचा चॉइस आहे.
बायडेन चीनचे पाळीव प्राणी, त्यांच्यापुढे हलवतात शेपटी; कंगणाची टीका
एकता कपूरला तिच्या छोट्या पडद्यावरील योगदानासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय टेलिव्हिजन अकादमीनं गौरवलं होतं. एकता कपूरच्या नव्या मालिकेत रिध्दि डोंगरा, मोनिका या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 8 मार्चला अल्ट बालाजीवर आणि जी 5 प्रीमियमवर प्रदर्शित होणार आहे.