लग्नानंतर दीपिकाचे नव्या घरी जोरदार स्वागत; दीपवीरचे भारतात आगमन

लग्नानंतर दीपिकाचे नव्या घरी जोरदार स्वागत; दीपवीरचे भारतात आगमन

मुंबई- इटलीत विधी पूर्ण केल्यानंतर दीपिका पादुकोण व रणवीर सिंग रविवारी मुंबईत दाखल झाले. पण मुंबईत परतल्यानंतर दीपिकाने रणवीरसोबत एक खास विधी पूर्ण केला. तो म्हणजे, गृहप्रवेशाचा. विमानतळावरून दीपिका थेट आपल्या नव्या घरी म्हणजेच सासरी पोहोचली. बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'ने इटलीतील लेक कोमा परिसरात विवाह केला होता. 14-15 नोव्हेंबर रोजी कोकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न करणारी ही जोडी मुंबईत दाखल झाली. मुंबई विमानतळावर आल्यानंतर काही क्षणांत त्यांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले.

रणवीरच्या घरी दीपिका नव्या नवरीसारखी पोहोचली. हातावर मेहंदी, भांगात लाल चुटूक कुंकू, हातात लाल चुडा आणि सोबत कांजीवरमचा लाल रंगाची भरजरी शाल या पारंपरिक पोशाखातील तिचा लूक अतिशय खास होता. रणवीर सिंग पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजामा व सोबत पिंक कलरच्या जॅकेटमध्ये होता. डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य देणारी ही जोडी मुंबई केव्हा येणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. मात्र मध्यरात्री या दोघांचं मुंबईमध्ये आगमन झालं आलं. विशेष म्हणजे या जोडीचं मुंबईत आगमन झाल्यानंतर चाहत्यांनी त्यांना विमातळावरच गराडा घातला होता.

विमानतळावर दीपिका व रणवीर यांना पाहताच मीडिया व चाहत्यांनी एकच गर्दी केली. यावेळी रणवीर पूर्णवेळ दीपिकाला सांभाळताना दिसला. विमानतळावरही दोघांनी चाहत्यांना अभिवादन केले. दीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचे आई-बाबा व बहीण सगळे हजर होते. दरम्यान, लग्नानंतर दीपवीर भारतात तीन रिसेप्शन देणार आहेत. येत्या 21 नोव्हेंबरला बेंगळुरू येथे दीपवीरच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन होईल. दीपिकाचे आई-वडिल हे रिसेप्शन होस्ट करतील. यानंतर येत्या 28 नोव्हेंबर आणि 01 डिसेंबरला मुंबईच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये दुसरे व तिसरे रिसेप्शन होणार आहे. 28 तारखेच्या रिसेप्शला केवळ मित्र आणि कुटुंबीय असतील. तर 1 डिसेंबरचे रिसेप्शन केवळ बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी असणार आहे असे सांगण्यात येत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com