ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहेत या वेबसिरीज ; कुठल्या त्या पाहा

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 3 October 2020

कोरोनाच्या काळात प्रचंड प्रतिसाद आतापर्यत प्रदर्शित झालेल्या मालिकांना मिळाला. त्या त्या मालिकांचा प्रेक्षक तर संबंधित एखाद्या मालिकेचा भाग केव्हा प्रदर्शित होणार याकडे लक्ष ठेवून होता. आता त्याची प्रतिक्षा संपली असून ऑक्टोबरचा महिना प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स, थ्रिलर, ड्रामा, हॉरर या प्रकारातील मालिका पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

मुंबई - लॉकडाऊनच्य़ा काळात वेबसिरीज स्ट्रेस बुस्टर ठरल्याचे दिसुन आले आहे. दरम्यान वेगवेगळ्या सिरीज प्रदर्शित झाल्या. कोरोनामुळे चित्रिकरण थांबले होते. यावर तातडीने मार्ग काढावा अशी मागणी अनेक निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याकडून करण्यात आली होती. ऑक्टोबरच्या अखेरीस काही वेबसिरीज प्रदर्शित होणार असून त्यांची मागील वर्षभरापासून प्रेक्षक वाट पाहत होते. त्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे. अॅमेझॉन प्राईम, नेटफिल्क्स, हॉटस्टार, झी आणि अल्ट बालाजी, मॅक्स प्लेयर,  यावर या मालिका प्रदर्शित होणार आहेत.

वास्तविक कोरोनाच्या काळात प्रचंड प्रतिसाद आतापर्यत प्रदर्शित झालेल्या मालिकांना मिळाला. त्या त्या मालिकांचा प्रेक्षक तर संबंधित एखाद्या मालिकेचा भाग केव्हा प्रदर्शित होणार याकडे लक्ष ठेवून होता. आता त्याची प्रतिक्षा संपली असून ऑक्टोबरचा महिना प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स, थ्रिलर, ड्रामा, हॉरर या प्रकारातील मालिका पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

१. हाय ( ७ ऑक्टोबर, मॅक्स प्लेयर)
कलाकार - अक्षय ऑबेरॉय, रणवीर शौरी, मृण्मयी गोडबोले, श्वेता बसू प्रसाद, कुणाल नाईक, प्रकाश बेलावाडिहाय यांची मुख्य भूमिका असलेली हाय नावाची मालिका येत्या ऑक्टोबरला मॅक्स प्लेयरवर प्रदर्शित होणार आहे.

high on MX player

२. गंधी बात -५ वा सिझन (८ ऑक्टोबर, अल्ट बालाजी ) 
बोल्ड आणि बिनधास्त बरीचशी ‘इरॉटिक’ या प्रकाराकडे झुकलेल्या  गंधी बातचा ५ वा सिजन आता येत आहे. यात अमिका शैल, फरमान हैदर, पूजा डे, सन्या बन्सल, अंकित भाटिया. आणि पामेला मोंडलगंडी यांच्या भूमिका आहेत. अल्ट बालाजी आणि झी ५ यावर ही मालिका प्रदर्शित होणार असून त्याची निर्मिती एकता कपूरने केली आहे.

gandii baat 5

३. स्कॅम १९९२, द हर्षद मेहता स्टोरी - (९ ऑक्टोबर २०२०) 
हर्षद मेहता याच्याशी संबंधित वाद विवादांवर आधारित स्कॅम - १९९२, द हर्षद मेहता स्टोरी  ही मालिका ९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यात प्रतिक गांधी, श्रेया धन्वंतरी, शबीब हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Scam 1992 the harshad mehta story

४. पॉईझन -२ (१६ ऑक्टोबर, झी ५ )
आफताब शिवदासानी, राई लक्ष्मी, पूजा चोप्रा आणि राहूल देव यांच्या भूमिका असलेली पॉईझन -२ ही मालिका १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. क्राईम थ्रिलर या प्रकारांत मोडणारी मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. विशाल पांड्या यांनी ही मालिका दिग्दर्शित केली आहे.

poison-2-on-zee5-

५. मिर्झापूर २ (अॅमेझॉन प्राईम, २३ ऑक्टोबर) 
पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर मिर्झापूरच्या २ -या भागाचे वेध केव्हापासून प्रेक्षकांना लागले होते. अखेर त्याची प्रतिक्षा संपली असून ती आता २३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पंकज त्रिपाठी यांच्यासह अली फैजल, विक्रांत मैसी, दिव्यांदू शर्मा, रसिका दूग्गल, श्रिया पिळगावकर यांच्या भूमिका आहे.

Mirzapur 2,

६. नक्षलबारी - (झी ५, ऑक्टोबर  - तारीख निश्चित नाही) 
झी ५ वर ऑक्टोबर महिन्यात ही मालिका रिलिज होणार आहे. मात्र अद्याप त्याच्या प्रदर्शनाची तारीखेची घोषणा करण्यात आलेली नाही. यात राजीव खंडेलवाल, टीना दत्ता, श्रीजिता डे आणि सत्यदीप मिश्रा य़ांच्या भूमिका आहेत. नक्षलवादाशी दोन हात करणा-या तपास अधिका-याची कथा त्यातून मांडण्यात आली आहे.

naxalbari

७. बँग बँग - (झी ५ आणि अल्ट बालाजी, तारीख निश्चित नाही) 
 ऑक्टोबर महिन्यात बँग बँग ही मालिका प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आलेली नाही. अॅक्शन, मिस्ट्री, ड्रामा, याने परिपूर्ण असलेल्या या मालिकेत फैजल शेख, रुही सिंग यांच्या यात महत्वाच्या भूमिका आहेत.  ब्लॅक विंडोज OctoberStar Cast:  Faisal Shaikh and Ruhi Singh.

Bang Bang ZEE5 Web series

८. ब्लॅक विंडोज - (झी ५) 
मोना सिंग, स्वस्तिक मुखर्जी आणि शमिता शेट्टी यांच्या मुख्य भूमिका असलेली ही मालिका ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. झी ५ कडून नुकतीच या नवीन मालिकेची घोषणा करण्यात आली आहे.

९. द फॅमिली मॅन २ - (अॅमेझॉन प्राईम) 
द फॅमिली मॅनचा पहिला भाग कमालीचा लोकप्रिय झाल्याचे दिसून आले. या मालिकेतील मुख्य अभिनेता मनोज वाजपेयी याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. वर्षभरापासून प्रेक्षक या मालिकेच्या २ -या भागाची आतूरतेने वाट पाहत आहेत. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ही मालिका रसिकांच्या भेटीला येण्याची   

The Family Man 2,


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News Entertainment Bollywood Upcoming Web Series in the month of october