निक प्रियांकाच्या स्माईलचा दिवाना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

बॉलीवूडमधून हॉलीवूडमध्ये गेलेली प्रियांका चोप्रा आता हॉलीवूडमध्ये चांगलीच रमली आहे. तिचे हॉलीवूडमध्येही अनेक मित्र झाले आहेत. सध्या तिचे आणि निक जोनासमध्ये काहीतरी सुरू असल्याच्या बातम्याही येत आहेत. निक जोनास हा प्रियांकाचा क्वांटिको या मालिकेतील सहकलाकार आहे. दोघेही आजकाल एकत्र फिरताना दिसतायंत.

नुकतेच प्रियांकाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये ती आपल्या मैत्रिणींबरोबर जेवण्यासाठी बाहेर गेली होती आणि खळाळून हसतानाही दिसत होती. या फोटोवर अनेक जणांनी कमेंट्‌स केल्या आहेत; पण एका कमेंटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. निक जोनासने तिच्या या फोटोवर दॅट्‌स स्माईल अं... लिहून पुढे हार्टचे इमोजी वापरले आहेत. ही कमेंट वाचून अनेकांना त्यांच्यात नेमके काय चाल्लय काय? याची उत्सुकता लागली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nick likes priyanka chopras smile