नवाजुद्दीन आला आणखी गोत्यात!

niharika singh miss india ms lovely nawazuddin siddique esakal news
niharika singh miss india ms lovely nawazuddin siddique esakal news

निहारिका सिंग-गुलाटी या अभिनेत्रीची फसवणूक केल्याचा दावा 

मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकीने आत्मचरित्र लिहिलं आणि ते लोकप्रिय होेण्याएेवजी भलत्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्याची एनएसडीमधली मैत्रीण, माजी प्रेयसी सुनीता राजावतने त्याने लिहिलेल्या तिच्याबद्दलच्या मजकुरावर आक्षेप घेतला. लिहिलेला मजकूर हा पूर्णपणे काल्पनिक असल्याचं सांगतानाच, नवाजच्या दरिद्री मनोवस्थेवरही तिने बोट ठेवून टीका केली होती. ती ताजी असतानाच आता माजी मिस इंडिया निहारिका सिंगच्या प्रकरणामुळेही आता नवाज पुन्हा गोत्यात आला आहे. 

आपल्या पुस्तकात त्याने आपली अफेअर्स जाहीर मांडली आहेत. पण ते लिहिताना कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्याने अशी काहीतरी घाई नडली आहे. दिल्ली येथील एका वकिलाने महिला आयोगाकडे नवाजुद्दीन सिद्दीकीची तक्रार केली आहे. निहारिका सिंगसोबत त्याचं अफेअर होतं. पण त्याबद्दल लिहिताना तिला याबाबत कोणतीही माहीती दिली गेली नाही. शिवाय, हे अफेअर चालू असतनाच नवाजुद्दीनने लग्न केलं. ही बाब त्यावेळी तिच्यापासून लपवण्यात आली होती असंही यात म्हटलं आहे. त्याच्या पुस्तकामुळेच ही बाब उघड झाली असं या वकीलाने म्हटलं आहे. 

निहारिका सिंग-गुलाटी ही माजी भारत सुंदरी असून ती आणि नवाज मिस लवली या चित्रपटामुळे एकत्र आले होते. हा चित्रपट करत असताना दोघांत नातंही तयार झाल्याचा दुजोरा निहारिकाने दिला आहे. हे प्रेमप्रकरण चालू असतानाच नवाजुद्दीनने निहारिकाला कोणतीही कल्पना न देता लग्न केलं, ही एकप्रकारची फसवणूक आहे, असं या तक्रारीत दिल्ली येथील वकिलाने नमूद केलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com